अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मुसळधार; २४ जणांचा बळी, २० हून अधिक मुली बेपत्ता!

  40

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक पूरस्थितीने भीषण हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून, एका उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या २० हून अधिक मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यामुळे आजूबाजूची जंगले, कॅम्पग्राउंड्स आणि मानवी वस्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.



अचानक आलेल्या पुरामुळे बचावकार्य युद्धपातळीवर


मदत आणि बचाव पथकांनी तातडीने बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने टेक्सास हिल कंट्रीमधील केर काउंटीच्या काही भागांमध्ये वादळी पावसामुळे अचानक पूर आणीबाणी जाहीर केली आहे. केरव्हिलचे शहर व्यवस्थापक डाल्टन राईस यांनी सांगितले की, पहाटेच्या आधी हा मोठा पूर आला आणि लोकांना कोणताही इशारा देण्याची संधी मिळाली नाही.



नदीची पातळी ४५ मिनिटांत २६ फुटांनी वाढली!


मुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी केवळ ४५ मिनिटांत तब्बल २६ फुटांनी वाढली. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सध्या १४ हेलिकॉप्टर आणि ड्रोन बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी शोध क्षेत्रावरून उडवले जात आहेत. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत सॅन अँटोनियो ते वाकोपर्यंत पूर येण्याचा धोका वर्तवला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.


टेक्सासमधील या आपत्कालीन स्थितीमुळे प्रशासनावर मोठा ताण आला असून, बेपत्ता लोकांचा शोध आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

Nehal Modi Arrested: पीएनबी घोटाळ्यात भाऊ नीरवला मदत करून नेहल अशाप्रकारे अडकला, EDने अमेरिकेत मुसक्या आवळल्या

वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँक (PNB Bank Scam) घोटाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) चा भाऊ नेहल दीपक मोदी  (Nehal Modi)

नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक

वॉशिंग्टन डी. सी. : हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा धाकट भाऊ नेहल याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली

मायक्रोसॉफ्ट कंपनीने पाकिस्तानमधील कार्यालय केले बंद

इस्लामाबाद : सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले

अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारला रशियाची मान्यता

मॉस्को : रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत

अमेरिकेच्या संसदेत संमत झाले One Big Beautiful Bill, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे वन बिग ब्युटीफूल विधेयक गुरूवारी रात्री उशिरा संमत झाले.

जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानच्या मुफ्ती हबीबुल्ला हक्कानीची हत्या

बरवाल :  पाकिस्तानमधील अप्पर दिरच्या बरवाल बेंद्रा भागात 'जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तान'च्या मुफ्ती हबीबुल्ला