Saturday, July 5, 2025

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले
मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी २० सामने होणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आधी ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू होणार असलेली स्पर्धा आता सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड नव्याने चर्चा करुन स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक निश्चित करतील. यानंतर ते जाहीर केले जाईल.

बांगलादेशमधील कायदा सुव्यवस्था

बांगलादेशमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार अस्तित्वात नाही. बांगलादेश सरकारचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी देशात पुढील वर्षीपर्यंत निवडणूक घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले होत आहेत. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धचा क्रिकेट दौरा सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.
Comments
Add Comment