Passenger Jump from Plane: आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; कुठे घडली ही घटना? जाणून घ्या

  20

स्पेन: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. ज्यामध्ये आता स्पेनमधील पाल्मा दे मॅलोर्का विमानतळावरील रायनएअरच्या बोईंग ७३७ विमानाबाबतची बातमी समोर आली आहे. शनिवारी मँचेस्टरला जाणारे हे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच, या विमानाला आगीचा इशारा देण्यात आला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली, ज्यात एकूण १८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अरब टाईम्सच्या वृत्तानुसार, आपत्कालीन विभागाला परिस्थितीची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विमानतळावरील अग्निशमन दल आणि सिव्हिल गार्डच्या सदस्यांसह प्रादेशिक आपत्कालीन समन्वय केंद्राने चार रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या होत्या.

काही प्रवाशांनी विमानाच्या पंखावरून मारल्या उड्या


घटनेदरम्यान, प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने विमानातून बाहेर काढण्यात आले, तर काही प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी विमानाच्या पंखावरून थेट जमिनीवर उडी मारली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी घाबरून आपत्कालीन मार्गातून विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. याचबरोबर, काही प्रवासी आधी विमानाच्या पंखावर चढताना आणि नंतर जमिनीवर उडी मारताना दिसत आहेत.


सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सेवा


प्रादेशिक आपत्कालीन समन्वय केंद्राच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अठरा प्रवासी जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेला रायनएअर या विमान कंपनीने दुजोरा दिला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “४ जुलै रोजी पाल्माहून मँचेस्टरला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण, आगीची खोटी सूचना देणारा दिवा चालू झाल्यामुळे थांबवावे लागले. यानंतर विविध उपाययोजना करून प्रवाशांना खाली उतरवून टर्मिनलवर आणण्यात आले.”

गेल्या आठवड्यात, अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानात अशीच एक घटना घडली होती. त्या विमानाच्या एका इंजिनाला हवेत आग लागली होती. १५३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असलेल्या या विमानाचे उड्डाणानंतर काही वेळातच लास वेगासमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.
Comments
Add Comment

Nehal Modi Arrested: पीएनबी घोटाळ्यात भाऊ नीरवला मदत करून नेहल अशाप्रकारे अडकला, EDने अमेरिकेत मुसक्या आवळल्या

वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँक (PNB Bank Scam) घोटाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) चा भाऊ नेहल दीपक मोदी  (Nehal Modi)

नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक

वॉशिंग्टन डी. सी. : हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा धाकट भाऊ नेहल याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मुसळधार; २४ जणांचा बळी, २० हून अधिक मुली बेपत्ता!

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक पूरस्थितीने भीषण हाहाकार माजवला

मायक्रोसॉफ्ट कंपनीने पाकिस्तानमधील कार्यालय केले बंद

इस्लामाबाद : सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले

अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारला रशियाची मान्यता

मॉस्को : रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत

अमेरिकेच्या संसदेत संमत झाले One Big Beautiful Bill, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे वन बिग ब्युटीफूल विधेयक गुरूवारी रात्री उशिरा संमत झाले.