Saturday, July 5, 2025

नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक

नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक
वॉशिंग्टन डी. सी. : हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा धाकट भाऊ नेहल याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय यांच्या विनंतीनंतर अमेरिकेते नेहलला अटक करण्यात आली आहे. नेहलला अमेरिकेच्या न्यायालयात हजर केले जाईल. नेहल न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तर भारत ट्रान्झिट वॉरंट घेऊन नेहलला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय तपास संस्था अमेरिकेच्या माध्यमातून आधी नेहलच्या जामीन अर्जाला विरोध करण्याची तयारी करत आहेत.

पीएमएलए कलम ३ अंतर्गत आर्थिक गैरव्यवहाराचा तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब आणि २०१ अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप नेहल मोदीवर आहे.

नेहल मोदीची अटक पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या तेरा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. या घोटाळ्यात नीरव मोदी, नेहल मोदी आणि त्यांचा मामा मेहुल चोक्सी या तीन जणांचा हात होता. बेल्जियममधील अँटवर्प येथे जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या नेहल मोदीला भारतात आणून त्याच्या विरोधात भारतातील कायद्यानुसार कारवाई करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यासाठीच नेहलचा ताबा मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

नेहल मोदी विरोधात इंटरपोलने २०१९ मध्ये पहिल्यांदा रेड कॉर्नर नोटीस काढली. तो अमेरिकेत असल्याची माहिती २०२१ मध्ये मिळाली. ही माहिती मिळाल्यावर ईडी आणि सीबीआयच्या विनंती नंतर अमेरिकेने नेहल मोदीला अटक केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा