Saturday, July 5, 2025

Bank of Baroda Report: पहिल्या तिमाहीत आरबीआयच्या माहिती अनुसार महागाईत घसरणच अपेक्षित

Bank of Baroda Report: पहिल्या तिमाहीत आरबीआयच्या माहिती अनुसार महागाईत घसरणच अपेक्षित
बँक ऑफ बडोदाचा अहवाल प्रसिद्ध

प्रतिनिधी: 'आरबीआयने केलेल्या महागाईच्या अंदाजाप्रमाणेच आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत महागाई (Inflation) राहू शकते असे बँक ऑफ बडोदाने आपल्या अहवालात म्हटले आहे. नुकताच बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda)  नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे  ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर व आरबीआयच्या सद्यस्थितीतील निर्णयावर त्यांनी विस्तृतपणे प्रकाश टाकला. याशिवाय सध्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये सांख्यिकीय माहिती (Statistical Information) प्रमाणे स्वस्ताई (Deflation) राहू शकतो.

रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, आरबीआयच्या नव्या महागाई अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ग्राहक महागाई निर्देशांक (Consumer Price Index CPI) महागाई दर ३.७% राहू शकतो. पहिल्या तिमाहीत (Q1) २.९%, दुसऱ्या तिमा हीत (Q2) मध्ये ३.४%, तिसऱ्या तिमाहीत (Q3) मध्ये ३.९%, चौथ्या तिमाहीत (Q4) ४.४% राहू शकतो. आरबीआयच्या अनुषंगिक भाकीतानुसार हा दर कायम राहू शकतो असा निर्वाळा बँक ऑफ बडोदा अहवालात दिला गेला.  बँक ऑफ बडोदा इंसेनशियल कमोडिटीज इंडेक्समध्ये (BoB ECI) जून २०२५ मध्ये घसरण इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १.८% टक्क्याने घसरण होऊ शकते असे म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मे महिन्यात एप्रिल तुलनेत निर्देशांकात  ०.६% घसरण झाली होती. सध्या भाजीपाला व डाळी यांच्या उत्पादनात अनुकूल वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळेच बाजारातील या उत्पादनांच्या किंमतीत फेरबदल होऊन किंमतीत घसरण झाली आहे.' असे निरीक्षण यात नोंदवले गेले आहे.

सध्या सांख्यिकी पातळीवर अनुकूलता असल्याने स्वस्त दरपातळी कायम राहू शकते. जुन २०२५ मध्ये ही परिस्थिती कायम राहू शकते. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) जून २०२५ पर्यंत २.६% वर राहू शकतो. आरबीआयला या निमित्ताने वाढ निर्देशित (Growth Oriented) उपाययोजनेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.' असे अहवालातील निरिक्षणात म्हटले आहे.  टॉप (Top)  (टोमॅटो, कांदा, बटाटा) श्रेणीतील भाज्यांनी घसरणीचा ट्रेंड आघाडीवर ठेवला. जूनमध्ये कांदे आणि बटाट्याच्या किरकोळ किमती अनुक्रमे -२६.१ टक्के आणि -२०.३ टक्क्यांनी घसरल्या, तर टोमॅटो -२४ टक्क्यांनी किंचित मंद गतीने घसरले. डाळींमध्ये, तूरने -२३.८ टक्क्यांची सर्वात मोठी वार्षिक घसरण नोंदवली, जी सलग चौथ्या महिन्यात दुहेरी अंकी घसरण दर्शवते. उडद, मसूर आणि मूग यासारख्या इतर डाळींनीही सातत्याने घसरणीचा ट्रेंड दाखवला, ज्यामुळे त्यांना पाठिंबा मिळाला असेही या अहवालात म्हटले गेले.

गरजेच्या वस्तूंचा आढावा घेताना अहवालात म्हटले, 'जूनमध्ये धान्य, विशेषतः तांदळाच्या किरकोळ किमती -५.१ टक्क्यांनी कमी झाल्या. मीठ आणि गूळ यासारख्या विविध वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात स्थिर राहिल्या, तर खाद्यतेलांच्या किमती वाढल्या, जरी अनुकूल आंतरराष्ट्रीय किमतीच्या ट्रेंडमुळे त्यांना पाठिंबा मिळाला.' महिन्या-दर-महिना (MoM) आधारावर, BoB अहवालात जूनमध्ये ०.६ टक्क्यांची माफक वाढ नोंदवली गेली. तथापि, हंगामी समायोजित (Modesh Upstick) MoM आकृती (Mom Figure) प्रत्यक्षात -०.७ टक्क्यांनी कमी झाली, हे दर्शविते की बहुतेक अनुक्रमिक वाढ हंगामी स्वरूपाची होती असे अहवालात म्हटले आहे. चलनवाढ आरबीआयच्या वरच्या सहनशीलतेच्या रेषेखाली अस ल्याने आणि पुरवठा बाजूचा दबाव मोठ्या प्रमाणात नियंत्रणात असल्याने, मध्यवर्ती बँकेला तात्पुरता निश्चिंतपणा दिसतो, ज्यामुळे पुढील महिन्यांत वाढीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करता येईल, असे अंतिमतः अहवालात म्हटले गेले.
Comments
Add Comment