Saturday, July 5, 2025

Bank Holidays: खातेदारांनो 'या' दिवशी बँका बंद राहणार आपले व्यवहार आजच करून घ्या !

Bank Holidays: खातेदारांनो 'या' दिवशी बँका बंद राहणार आपले व्यवहार आजच करून घ्या !
प्रतिनिधी: खातेदारांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. आपले बँकेचे व्यवहार संपले नसतील तर आजच करुन घ्या! ५ जुलै ते १३ जुलैपर्यंत बँक बंद राहणार आहेत. याशिवाय पुढील शनिवारी व रविवारी सुट्टी असणारच आहे. विविध सणांच्या तारखा एकत्र आल्याने बँक बंद राहणार आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार, ५ ते १३ तारखांदरम्यान बँकांना तीन दिवस सुट्टया राहणार आहेत.

कुठल्या दिवशी सुट्टी आहेत पाहूयात !

५ जुलै - गुरू हरगोविंद जयंती (जम्मू आणि श्रीनगर साठीच लागू)

६ जुलै - रविवार

१२ जुलै - दुसरा शनिवार

१३ जुलै - रविवार

१ सप्टेंबर २०२५ पासून आरबीआयच्या अधिनियमात, शेड्युल व विना शेड्युल बँकांना खाजगी, सरकारी, विदेशी, व सगळ्या प्रकारच्या बँकांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे तुम्हाला पैशाचे व्यवहार करायचे असतील तर इतर दिवशी केल्यास ते सोयीस्कर पडणार आहेत.
Comments
Add Comment