Saturday, July 5, 2025

Ajit Pawar: माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं!

Ajit Pawar: माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं!

पुणे: प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पारडं जड ठरलं होतं, त्यानंतर आता त्यांची कारखान्याच्या चेअरमनपदावरही निवड केली गेली आहे. यामुळे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे साखर कारखान्याचे चेअरमनही झाले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. ब वर्गामधून निवडून आलेल्या व्यक्तीस चेअरमन होता येत नाही, असं विरोधकांचं म्हणणं होतं. मात्र त्यावर निवडणूक अधिकाऱ्याने वेळ संपल्याचं कारण देत अजित पवारांची चेअरमन पदावरील निवड कायम ठेवली. याचबरोबर व्हाईस चेअरमनपदावर संगिता कोकरे यांनी निवड झाली आहे.


दरम्यान या निवडी वरती विरोधी गटातील संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला. तावरे यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाची प्रत देत अजित पवार हे ब वर्गातून निवडून आल्यामुळे त्यांची चेअरमन पदी निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला तर रंजन तावरे यांनी माळेगाव कारखान्यासाठी अजित पवार यांनी एकदाही ऊस गाळपासाठी घातला नाही असा आरोप केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >