नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी सध्या त्यांच्या ५ देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा तब्बल ५ आठवड्यांचा आहे.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत, जे त्यांचे जागतिक महत्त्व आणि प्रभाव दर्शवतात. त्यांनी आपल्या नेतृत्वाने भारताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख तर मिळवून दिलीच, पण जगातील अनेक देशांकडून त्यांना उच्च सन्मान मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ ते २०२५ पर्यंत कोणत्या देशांनी कोणते पुरस्कार? देऊन सन्मानित केले आहे.
नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशने रॅपिड प्रकारात अजिंक्यपद ...
१) ३ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना सौदी अरेबियाने ‘ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद’ने सन्मानित केले.
२) ४ जून २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानने ‘स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान’ पुरस्काराने सन्मानित केले.
३) १० फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
४) ८ जून २०१९ रोजी मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन’ने सन्मानित केले.
५) २४ ऑगस्ट २०१९ रोजी पीएम मोदींना UAE द्वारे ‘ऑर्डर ऑफ झायेद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
६) २४ ऑगस्ट २०१९ रोजी, पीएम मोदींना बहरीनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स’ने सन्मानित केले.
७) २१ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित केले.
८) १२. मे २०२३ मध्ये पलाऊ यांनी पंतप्रधान मोदींना 'एबाकल' पुरस्काराने सन्मानित केले.
९) २२ मे २०२३ रोजी, फिजीने आपला सर्वोच्च नागरी सन्मान, ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ प्रदान केला.
१०) २२ मे २०२३ रोजी PM मोदींना पापुआ न्यू गिनी द्वारे ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द पीपल’ ने देखील सन्मानित करण्यात आले.
११) २५ जून २०२३ रोजी पंतप्रधान मोदींना इजिप्तमध्ये ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ने सन्मानित करण्यात आले.
१२) १४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले.
१३) २५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रीसने पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑर्डर ऑफ ऑनर’ने सन्मानित केले.
१४) २४ मार्च २०२४ रोजी भूतानने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.
१५) ९ जुलै २०२४ रोजी रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ पुरस्काराने सन्मानित केले.
१६) १८ नोव्हेंबर २०२४ रोजी नायजेरियाने पंतप्रधान मोदींना 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' हा पुरस्कार प्रदान केला.
१७) २० नोव्हेंबर २०२४ रोजी डोमिनिकाने पंतप्रधान मोदींना 'डोमिनिका' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१८) २० नोव्हेंबर २०२४ रोजी गयानाने पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मान केला.
१९) २० नोव्हेंबर २०२४ रोजी बार्बाडोसने पंतप्रधान मोदींना 'बार्बाडोस मानद ऑर्डर ऑफ फ्रीड'म प्रदान केला.
२०) कुवेतने पंतप्रधान मोदींना २२ डिसेंबर २०२४ रोजी 'ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर' प्रदान केला.
२१) ११ मार्च २०२५ रोजी मॉरिशसने पंतप्रधान मोदींना 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की' हा पुरस्कार प्रदान केला.
२२) श्रीलंकेने पंतप्रधान मोदींना एप्रिल २०२५ मध्ये 'श्रीलंका मित्र विभूषणा'चा सन्मान केला.
२३) १६ जून २०२५ रोजी पंतप्रधान मोदींना सायप्रसने 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस' III प्रदान केला.
२४) घानाने २ जुलै रोजी पंतप्रधान मोदींना 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा पुरस्कार प्रदान केला.
२५) ४ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोने 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.