डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

  18

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण


बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई म्हणून बदलापूरकडे पाहिले जात असले तरी, शहराला पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांसह इतर ही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच असते, हे वास्तव आहे. पाणी आणि वीज यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर भव्य हंडा कळशी आणि जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


बदलापूर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते जीवन प्राधिकरणाच्या बेलवली येथील कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. बदलापुरात मागील अनेक दिवसांपासून नियमितपणे पाण्याची टंचाई जाणवते. शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.


त्यामुळे, लोकांना अनेकवेळा पाण्यावाचून त्रास सहन करावा लागतो. अनियमित आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा,ठिकठिकाणी होणारा गढूळ पाणी पुरवठा याचा निषेध करण्यासाठी भव्य हंडा - कळशी तर कोणतीही पूर्व सूचना न देता वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, काही ठिकाणी डीम लाईट असणे, वीज अधिकारी फोन न उचलणे,सतत फोन बिझी असणे आणि कधी फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे देणे याचा निषेध करण्यासाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्रीधर पाटील, तुकाराम म्हात्रे, अविनाश मोरे, बाळाराम कांबरी, चेतन धुळे, मनोहर आंबवणे, तसेच महिला आणि पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांकडून पत्रकारांना शिष्टमंडळाच्या सोबत जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला.



आश्वासने पूर्ण नाही केली तर गावाला पाठवू - वामन म्हात्रे


शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शुक्रवार पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. एका महिन्याच्या आत एक कोटीचा निधी मंजूर करून जनरेटर देणार असून आश्वासन पूर्ण केले नाही तर सबंधित अधिकाऱ्याला घरी पाठवू इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक