Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत


मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.



बिनशेती परवानगी न घेता शासनाची फसवणूक


आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात सांगितले की, संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या भूखंडाची बिनशेती (एनए) परवानगी न घेता, शासकीय मोजणी न करता, नजराणा न भरता आणि तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत १६ तुकडे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे भूखंड खरेदीखतात 'बैल गोठ्यांसाठी' खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले आहे, हे खरे आहे. एकूण २५८ दस्तऐवज (डीड) नोंदवण्यात आले आहेत. मुद्रांक अधिकारी घुरके, गावित, गुप्ते, हिरे, कळसकर यांनी अनधिकृत दस्त नोंदणी केल्याने त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.




आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या चुका


२०१३ सालापासून आठ मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुका केल्याचे त्यांनी नमूद केले. कोणते दस्त चुकीचे नोंदवले आहेत, याची येत्या सात दिवसांत प्राथमिक चौकशी करून अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सभागृहात माहिती दिली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तसेच, या प्रकरणात मालेगाव (नाशिक) येथील मुद्रांक अधिकारी (स्टॅम्प व्हेंडर) झाकीर आणि आरीफ अब्दुल लतीफ तसेच त्यांचे साथीदार अपव्यवहारात दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५