Friday, July 4, 2025

Share Market : सेन्सेक्स व निफ्टीची रडतखडत सुरूवात सेन्सेक्स ७.०६ व निफ्टी २८.२० अंकाने वाढला 'हा' धोका कायम!

Share Market : सेन्सेक्स व निफ्टीची रडतखडत सुरूवात सेन्सेक्स ७.०६ व निफ्टी २८.२० अंकाने वाढला 'हा' धोका कायम!

मोहित सोमण: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने सकाळी रडतखडत सुरूवात केली आहे. कालच्या दबावाची पुनरावृत्ती आजही कायम आहे. सेन्सेक्स (Sensex) ७.०६ अंकाने वाढला असून निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात २८.२० अंकाने वाढ झाली आहे. प्रामुख्याने अमेरिका भारत व्यापाराची अनिश्चितता झाल्याने विशेषतः सेबीने नुकतीच युएसस्थित सूचीबद्ध (Listed) कंपनी Jane Street कंपनीला अनैतिक पद्धतीचा दाखला देत बाजारातून प्रतिबंधित केले आहे. त्यामुळे घरगुती गुंतवणूकदारांचा ओघ तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा घटलेल्याने बाजारात चैतन्याचाच अभाव आहे. परिणामी सकाळच्या सत्रात शेअर बाजाराची सुरूवात सावधतेने होत आहे.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४०,०.३० अंकांने वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२८, ०.१९ अंकाने वाढ झाली आहे. आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने ढासळत चाललेली बँक निर्देशांक पातळी भरून काढण्यासाठी कामाला येत आहे. दुसरीकडे सलग तिसऱ्यांदा आज बँक निर्देशांकात तुलनात्मक घट झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३५.७५ अंकांने घसरण झाली आहे तर बँक निफ्टीत ८ अंकांने घसरण झाली.


आज विशेषतः वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक ०.१२% सकारात्मक पातळीवर राहिल्याने आज समभागातील विशेष चढउतार अपेक्षित नाही अर्थात त्याबद्दल अंतिम हालचाल नव्या अपडेट्सनंतर अखेरच्या सत्रात अपेक्षित असेल.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nify Sectoral Indices) यामध्ये अनेक समभागात वाढ झाली असून तीन - चार क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. उदाहरणार्थ सर्वाधिक वाढ मिडिया (०.६०%), फार्मा (०.४९%), हेल्थकेअर (०.५१%), एफएमसीजी (०.३४%), रिअल्टी (०.८९%) समभागात झाले आहे. नुकसान मात्र मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३९%) समभागात होत असून याशिवाय मेटल (०.०१%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.०१%) समभागात झाले आहे.


बारकाईने पाहता आज बाजारातील समभागात अपवादात्मक (Exponential) वाढ किंवा घसरण दिसत नाही. अस्थिरतेची पातळीही मर्यादित असली तरी अमेरिकेन फर्मला सेबीने प्रतिबंधित केल्यानंतर विविध मतांतराचा प्रवाह बाजारात आहे.अजूनही अमेरिकन गुंतवणूकदार फेडचे नवे वक्तव्य व पेरोल आकडेवारीची वाट पाहत असल्याने बाजारातील अस्थिरता कायम आहे. विशेषतः सकाळी आलेल्याच टाटा समुहाच्या बातमीनंतर ट्रेंट कंपनीचा शेअर्सला ९% एवढे धडध डीत नुकसान झाले. व्यवस्थापनाचा (Management) कमोजरपणा व ब्रोकिंग कंपनीचा नकारात्मक अहवाल पाहता आगामी तिमाही निकालाचा पार्श्वभूमीवर घरगुती गुंतवणूकदार सुद्धा चिंता व्यक्त करत आहेत.


आज सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सर्वाधिक वाढ सफायर फूडस (९.०%), किर्लोस्कर ब्रदर्स (६.७३%), ओला इलेक्ट्रिक (४.५१%), इंजिनियर्स इंडिया (३.८८%), क्राफ्ट्समन ऑटो (३.६९%), बीओसच (Bosch ३.६८%), रेमंड लाईफ स्टाईल (३.४६%), मॅरिको (२.९%), बजाज फायनान्स (२.०९%), झी एंटरटेनमेंट (२.४३%), गार्डन रिच (२.४८%), महानगर गॅस (२.३३%), झेन टेक्नॉलॉजी (२.३२%), इन्फो ऐज इंडिया (२.१९%), रेडिको खेतान (१.९७%), आयसीआयसी आय प्रोडनशियल (१.५४%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.१५%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (१.००%), श्रीराम फायनान्स (०.९८%),पॉवर फायनान्स (०.७८%), डाबर इंडिया (०.७७%), अंबुजा सिमेंट (०.२५%) समभागात वाढ झाली आहे.


सर्वाधिक घसरण ट्रेंट (६.९१%), एंजल वन (५.४५%), नुवामा वेल्थ (४.७२%), बीएसई (३.८५%), नेटवर्क १८ मिडिया (२.०५%), बंधन बँक (१.७१%), नेटवेब टेक्नॉलॉजी (१.०४%), होनसा कंज्युमर (१.३८%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.०६%), टाटा स्टील (१.०१%), सिमेन्स (०.७७%), मारूती सुझुकी इंडिया (०.८८%), इंडसइंड बँक (०.५६%), टायटन कंपनी (०.५१%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.४९%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.४४%), मदर्सन (०.४२%),ओएनजी सी (०.३०%), टाटा मोटर्स (०.११%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,'२५२००-२५८०० निफ्टी रेंज तात्काळ तोडण्यासाठी कोणतेही ट्रिगर्स नाहीत. या रेंजमध्ये व्यव हार करत असतानाही बाजार लवचिक आहे. या लवचिकतेला बाह्यतः अमेरिकेतील मूळ बाजारपेठेतील ताकदीचा आधार आहे जिथे S&P ५०० आणि Nasdaq विक्रमी उच्चांकावर आहेत आणि स्थानिक पातळीवर बाजारात मजबूत आणि सतत प्रवाहाचा, ज्यामुळे DIIs बाजारात खरेदीदार आहेत. या रेंजच्या वरच्या बाजूची मर्यादा ही मंद कमाईच्या वाढीमुळे आणि FY२६ मध्ये माफक कमाईच्या वाढीच्या अपेक्षांमुळे आहे. गुंतवणूकदारांनी कमाईच्या वाढीच्या मार्गात संभाव्य बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे, ज्याचे संकेत Q1 निकालांमध्ये उपलब्ध असतील, जे लवकरच येऊ लागतील. निकालांमधील कामगिरी क्षेत्र-विशिष्ट नसून कंपनी-विशिष्ट असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, ऑटो माफक संख्या नोंदवण्याची शक्यता आहे, परंतु TVS, Eicher आणि M&M उद्योगाच्या आकडेवारीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीत बजाज फायनान्स आणि श्रीराम फायनान्स चांगली कामगिरी करू शकतात. म्हणून, बाजाराची कृती स्टॉक-विशिष्ट असण्याची शक्यता आहे.'


बाजारातील निफ्टीविषयी मत व्यक्त करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले, 'जरी अपेक्षेप्रमाणे चढउतार झाले असले तरी, २५५८८ चा प्रदेश ज्याला आम्हाला प्रतिकार करण्याची शंका हो ती,तो दृढ राहिला, ज्यामुळे खरेदी व्याजात त्वरित माघार घेण्यास भाग पाडले गेले. या हालचालीमुळे मागील दिवसाच्या नीचांकी पातळीची पुनर्परीक्षण करण्यास भाग पाडले गेले आहे, ज्यामुळे २५३०० दिसण्याची भीती निर्माण झाली आहे,हा एक नकारात्मक उद्दिष्ट आहे ज्यासह आम्ही आठवड्याची सुरुवात केली होती. असे म्हटले जाते की, तासाभराच्या ऑसिलेटरची जास्त विक्री झाल्यामुळे, पसंतीचा दृश्य २५३७७ च्या पुढे न जाता आणखी एक चढउतार अपेक्षित आहे, म्हणजे च १०-दिवसांचा SMA (Simple Moving Average) अन्यथा, २५००० ची अपेक्षा करा.'


त्यामुळे बाजारातील एकूणच परिस्थिती पाहता, बाजारात सध्याच्या घडीला मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगले प्रदर्शन सुरू असल्याने बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली. मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा दबाव, घरगुती गुंतवणूकदारांची अस्थिरता यामुळे बाजारात छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांनी एकूण प्रभावाबरोबरच क्षेत्रीय विशेष समभागातील हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >