अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारला रशियाची मान्यता

मॉस्को : रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारल्याचे रशियाने जाहीर केले आहे. अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. या सरकारला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश आहे.

“आम्हाला विश्वास आहे की इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तानच्या सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या विकासाला चालना मिळेल” असे प्रसिद्धीपत्रक रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काढले आहे. रशियाचे उप परराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर अफगाण राजदूत गुल हसन यांची भेट घेत त्यांचं प्रमाणपत्र स्वीकारलं आहे.

तालिबान सरकारने रशियाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. रशियाच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास तालिबान सरकारने व्यक्त केला आहे. “आमच्या संबंधांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे” असे तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी म्हणाले.
Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या