
दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनपासून सुरू होणाऱ्या या प्रवासांतर्गत यात्रेकरूंना अयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, सीतामढी, जनकपुर, शृंगावेरपूर, नाशिक, हम्पी ते रामेश्वरमपर्यंत भगवान रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याची आणि प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
जिथे यात्रेकरूंना रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, राम की पायडी पाहण्याची संधी मिळणार आहे. यानंतर, भारत-हनुमान मंदिर, भरत कुंड, राम-जानकी मंदिर, जनकपूर धनुष धाम मंदिर आणि परशुराम कुंड, सीतामढी मधील जानकी मंदिर आणि पुनौरा धाम, राम रेखा घाट, रामेश्वर मंदिर, मनकत मंदिर, रामेश्वर मंदिरांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळेल.