
मोहित सोमण: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील अखेरच्या सत्रात आज दुपारपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बाजारात सकाळची परिस्थिती संध्याकाळपर्यंत जैसे थे राहिली आहे. सेन्सेक्स, निफ्टीत सत्राच्या अखेरीस किरकोळ वाढ कायम आहे. सकाळीच बाजाराची रडतखडत सुरूवात झाल्यानंतर अखेरही लुटुपूटू पद्धतीनेच झाली आहे. प्रामुख्याने बँक निर्देशांकाने अखेरी अनपेक्षितपणे वाढ प्राप्त केल्याने बाजारात सपोर्ट लेवल प्राप्त झाली. सेन्सेक्स १९३.४२ अंकांने वाढत ८३४३२.८९ पातळीवर पोहोचला असून निफ्टी ५५.७० अंकाने वाढत २५४६१.०० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २७७.१६ अंकाने वाढ झाल्याने सेन्सेक्स बँक निर्देशांक ६३६६१.८३ पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टी २३९.९५ अंकाने वाढत ५७०३१.९० पातळीवर पोहोचला आहे.
सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२३,०.१७% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.०१% घसरण झाली व स्मॉलकॅपमध्ये ०.०३% वाढ झाली आहे. सकाळनंतर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण झाली नसली तरी सकाळच्या तुलनेत वाढलेल्या निर्देशांकात मात्र उतरती कळा लागली. आज अखेरीस वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ०.५६% वर स्थिरावला आहे. सकाळच्या सत्रात हा निर्देशांक ०.१२% पातळीवर होता.म्हणजेच सूक्ष्म अंकानी ही वाढ झाली आहे. 'प्रहार' ने सकाळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आजच्या समभागात अतिरिक्त चढउतार पहायला मिळाली नाही. ती केवळ आणि केवळ मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये असलेल्या मजबूत 'फंडामेंटल' मुळे शक्य झाले.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये जास्तीतजास्त समभागात वाढ झाली आहे. काहीत मात्र घसरण कायम आहे. सर्वाधिक वाढ मिडस्मॉल हेल्थकेअर (१.०४%), हेल्थकेअर (०.६६%), तेल व गॅस (१.०५%), रिअल्टी (०.९१%), आयटी (०.८०%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.०८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.४०%), मेटल (०.४५%) समभागात झाली.
आजच्या एकूणच निफ्टीवरील दबाव पाहता बाजारात एकत्रीकरण (कंसोलिडेशन) होण्यास फारशी मदत झाली नाही. ट्रेंटची बातमी आल्यानंतर ट्रेंट, व एक्सिस बँकेच्या समभागात नुकसान झाल्यानंतर निफ्टी पातळी कमी झाली आहे. दुसरी कडे दुपारी २.३० नंतर पुन्हा शेअर बाजारात उसळी आल्याने बाजारातील निर्देशांक 'हिरव्या' रंगात बंद होण्यास मदत झाली. प्रथमतः जेन स्ट्रीट कंपनीवर सेबीने घातलेल्या बंदीनंतर नकारात्मक माहोल तयार होईल का ही गुंतवणूकदारांमध्ये शंका होती. बाजारात आज घर्षणही अपेक्षित होते मात्र मिडकॅपला गुंतवणूकदारांनी ब्लू चिप्स कंपन्यांच्या तुलनेत अधिक पसंती दिल्याने बाजार यशाला वहिवाट मिळाली होती.
आजही संमिश्र भावानं कायम असल्याने बाजारात घर्षण झाले आहे. अमेरिका भारत यांच्यातील व्यापारी करार अजूनही तळ्यात मळ्यात असल्याने बाजारात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता कायम होती. बाजारातील फंडामेंटल आधारे दिग्गज समभाग म्हणून ओळखले जाणारे एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक यांच्यात झालेल्या वाढीमुळे ही मजल गाठणे बाजारात शक्य झाले. औत्सुक्याचे म्हणजे सलग दुसऱ्यांदा आज निफ्टी मिडकॅप १५०, व स्मॉलकॅप १५० मध्ये वाढ झाली होती. या आठवड्यातील सर्वाधिक मार मिडिया, रिअल्टी समभागाने खाल्ला आहे त्याचाही परिणाम आज कायम राहिला.
पाच दिवसातच रेसिप्रोकल टेरिफ माफीची अंतिम मुदत ९ जुलैला संपत असल्याने अमेरिकेच्या आक्रमक पवित्र्याचा परिणाम आशियाई बाजारातील निर्देशांकात दिसत आहे. अशा परिस्थितीत भारताने सकारात्मक कामगिरी करणे ही एक प्रकारे प्रशंसेची बाब देखील ठरू शकते. आगामी तिमाही निकालाबाबत औत्सुक्याची किनार असल्याने बाजारात निश्चितच आवश्यक स्थैर्य नाही. दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज बँक निफ्टीत सुधारणा झाल्याने त्याचाही फायदा बा जारात गुंतवणूकदारांना झाला होता. कारण गेल्या आठवड्यात सर्वाधिक चढउतार बँक व फायनांशियल सर्विसेस समभागात झालेले आहे. एक्सिस बँकेच्या रिपोर्टनंतर आगामी काळात ऑटो समभागात तेजी अपेक्षित आहे.
आज क्रिझॅकचा आयपीओ (Crizac IPO) एकूण आयपीओतील २६.२२ पट सबस्क्राइब झाला आहे. त्यामध्ये एनआयआयने (NII)५८.८८ पट, क्यूआयबीने (QIB) ३४.२२ पट सबस्क्राइब केले आहे, तर रिटेल गुंतवणूकदारांनी (Retail Investors) सबस्क्रिप्शन ७.६६% पटीने मिळाले आहे. क्रिझॅकचा ८६० कोटी रुपयांचा आयपीओ हा ३.५१ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होता. क्रिझॅकचा आयपीओ २ जुलैपासून बोलीसाठी ( Bidding) खुला झाला आहे आणि आज ४ जुलै २०२५ रोजी संपेल. मागील आठवड्यात आयपीओची कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी आज आयपीओला आशावादी प्रतिसाद मिळत आहे. Meta Infotech आयपीओला पहिल्या दिवशी ९२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण जाणवले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता, आज पुन्हा फेडरल रिझर्व्ह मंडळाचे गर्व्हनर फ्रेडरिक मिशकीन यांनी सध्या कोणत्याही प्रकारची परिस्थिती दर कपातीचा अनुकूल नाही. त्यामुळे सध्या फेडरल व्याजदरात कपात आशा मावळ ल्यानंतर सोमवारी आशियाई बाजारातील दिशा वेगळी असू शकते. आज सत्राच्या सुरुवातीला युरोपियन बाजारावर अमेरिकेतील कोणत्याही घडामोडीचा नकारात्मक परिणाम झाला नाही ते केवळ सपाट (Flat) राहिले आहे. आशियाई बाजारातील निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद व संमिश्र भावना कायम आहे.
आज युएस शेअर बाजारातील डाऊजोन्स मध्ये (०.६२%) घसरण झाली तरी इतर दोन्ही म्हणजेच एस अँड पी ५०० (०.८३%), नासडाक (NASDAQ १.०२%) समभागात वाढ झाली आहे.युरोपियन बाजारातही एफटीएसई, सीएससी (CAC) डीएक्स (DAX) (०.००%) जैसे थे राहिले होते. आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टीत (०.१२%) घसरणीबरोबर,स्ट्रेट टाईम्स (०.२५%), हेंगसेंग (०.४८%), सेट कंपोझिट (०.२९%), जकार्ता कंपोझिट (०.२१%), तैवान वेटेड (०.७३%) बाजारात घसरण झाली. तर शांघाई कंपोझिट (०.५८%), निकेयी २२५ (०.०५%) समभागात वाढ झाली आहे.
आज भारतीय बाजारात सोन्याच्या व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. सलग तिसऱ्यांदा सोन्याचे भाव वाढल्यानंतर सोने दरांनी आज विश्रांती घेतली. ओपेक संघटनेने ऑगस्ट महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रति दिन ४११००० बॅरेल उत्पादनात वाढ करण्याची ठरवली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ओपेकची बैठक होणार असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीनेही आज विश्रांती घेतली. डॉलरमध्ये सातत्याने होत असलेली घसरण कच्च्या तेलाच्या निर्देशांकात परि वर्तित झाली होती. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ३१ पैशाने वधारल्याने बाजारात रूपयाला मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे भावना नकारात्मक न होता संमिश्र पातळीवर अंतिमतः पोहोचल्या आहेत.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सीपीसीएल (८.२५%), मस्टेक (५.२%), सफायर फूडस (५.०५%), बोसच (४.४३%), बीपीसीएल (४.४३%), किर्लोस्कर ब्रदर्स (४.०३%), रेंमड लाईफस्टाईल (३.४५%), अरबिंदो फार्मा (३.०४%),ओला इले क्ट्रिक (२.७६%), महानगर गॅस (२.२८%), भारत पेट्रोलियम (४.४३%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (१.८५%), आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स (१.७३%),सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोलूशन (१.३७%), इन्फोसिस (१.३६%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (१.२६%), आयसीआयसीआय बँक (१.१९%), विप्रो (१.१२%), टोरंट फार्मास्युटिकल (१.०२%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.६३%), एसबीआय (०.५९%), पंजाब नॅशनल बँक (०.५६%), एक्सिस बँक (०.५६%), एचडीएफसी बँक (०. ११%) समभागात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण नुवामा वेल्थ (११.२६%), सम्मान कॅपिटल (९.१५%), क्रिसील (२.२४%), टाटा स्टील (१.७५%), आयशर मोटर्स (१.५२%), अदानी ग्रीन एनर्जी (१.१६%), सिमेन्स एनर्जी इंडिया (०.८३%), इंडसइंड बँक (०. ७१%), टीव्हीएस मोटर्स (०.६६%), सिमेन्स (०.५८%), पॉवर फायनान्स (०.५३%), अदानी पॉवर (०.५३%), अदानी एंटरप्राईजेस (०.४६%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'अमेरीकेत आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याचे आकडे आज परत जाहीर झाले आणि दरकपातीची शक्यता कमी झाली.त्यातच भर म्हणुन सेबीच्या रडार वर एक विदेशी गुंतवणूकदार डे ट्रेडिंग करताना आढळला होता, त्याची चोकशी सुरू हौती.जानेवारी 24 पासुनची चोकशी आहै.या सर्व बातम्यांमुळे बाजारात मरगळ होती पण बाजार बंद होता होता बाजार पाॅझिटिव्ह बंद झाला. आज बाजार भारत अमेरीका ट्रेड डिल टेरिफबद्दल काय बातमी येते त्यावर लक्ष ठेऊन आहे. जेन स्ट्रीट लाइट भारतीय बाजारात बंदी घातली आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' बाजार बंद भाष्य ४ जुलै रोजी मंद पण सकारात्मक सत्रात, रेंजबाउंड ट्रेड दरम्यान बेंचमार्क निर्देशांक माफक वाढीसह संपले. निफ्टी २५,४५० च्या जवळ धातू वगळता सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक खरेदीच्या आवडीमुळे स्थिरावला. बाजाराची सुरुवात कमकुवत झाली, परंतु हेवीवेट काउंटरमध्ये जोरदार पुनरागमन झाल्याने सुरुवातीचे नुकसान कमी झाले, ज्यामुळे निर्देशांक दिवसाच्या २५४६१ च्या उच्चांकाजवळ बंद झाला. बंद होताना, सेन्सेक्स १९३.४२ अंकांनी किंवा ०.२३% ने वाढून ८३,४३२.८९ वर बंद झाला, तर निफ्टी ५५.७ अंकांनी किंवा ०.२२% ने वाढून २५,४६१ वर बंद झाला. आठवड्याच्या आधारावर, बीएसई सेन्से क्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये प्रत्येकी ०.७ टक्के घसरण झाली.'
टॅरिफ डेडलाइन जवळ येत असताना, सर्वांच्या नजरा अपेक्षित अमेरिका-भारत व्यापार करारावर आहेत. बाजारातील सहभागी अनुकूल ठरावाबद्दल आशावादी आहेत, जो बाजाराच्या पुढील टप्प्यातील वाढीच्या मार्गासाठी एक प्रमुख उत्प्रेर क (Catalyst) म्हणून काम करू शकतो. ऑटो,टेलिकॉम आणि धातू वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, बँकिंग, फार्मा, तेल आणि वायू, आयटी, रिअल्टी आणि मीडिया समभागांमध्ये ०.४-१ टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसून आली. व्यापक बाजार आघाडीच्या निर्देशांकांपेक्षा मागे पडले, ज्यामुळे सत्राचा शेवट मंद आणि स्थिर राहिला.
सध्याच्या निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' अलीकडील मजबूत वाढीच्या हालचालीनंतर स्टॉक विशिष्ट कृती दरम्यान साप्ताहिक चार्टवरील निफ्टीने उच्च आणि उच्च निम्न सिग्नलिंग एकत्रीकरणासह लहान अस्वल मेणबत्ती (Bear Candle) तयार केली आहे. पुढे जाऊन, निर्देशांक २५२०० -२५७०० च्या श्रेणीत सकारात्मक पूर्वाग्रहासह एकत्रीकरण वाढवेल. अलिकडच्या अपट्रेंडमध्ये मजबूत बाजार रुंदी आणि व्यापक-आधारित क्षेत्र सहभाग दिसून आला आहे,ज्यामुळे रॅलीच्या संरचनात्मक ताकदीत भर पडली आहे. २० दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA) आणि अलिकडच्या एकत्रीकरण ब्रेकआउट क्षेत्राच्या वरच्या सीमेचा (२५,२००-२४,५००) संगम (Integration)असल्याने, प्रमुख स्थितीत्मक आधार २५,२००-२५,००० पातळीवर आहे. निर्देशांक (Support Level) समर्थन क्षेत्राच्या वर राहील अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून, घसरणीचा वापर खरेदीची संधी म्हणून केला पाहिजे.'
बँक निफ्टीतील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' अलीकडच्या मजबूत वरच्या हालचालीनंतर आठवड्याच्या चार्टवरील बँक निफ्टीने उच्च आणि उच्च कमी सिग्नलिंग एकत्रीकरणासह एक लहान अस्वल मेणबत्ती तयार केली आहे. प्रमुख आधार ५६,०००-५५,५०० क्षेत्रावर ठेवण्यात आला आहे, जो प्रमुख तांत्रिक निर्देशकांचा संगम दर्शवितो ज्यामध्ये ५०-दिवसांचा EMA, अलिकडच्या रॅलीचा ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट(Retretment) (५५१४९-५७६१४) समाविष्ट आहे. येत्या सत्रांमध्ये निर्देशांक ५६,०००-५७,५०० च्या श्रेणीत एकत्रीकरणात प्रवेश करेल अशी आमची अपेक्षा आहे. येत्या आठवड्यात फक्त ५७,५०० च्या वर गेल्यास ५८,५०० च्या पातळीकडे आणखी वरची पातळी उघडेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'निफ्टीचा दैनिक चार्ट हातोडा पॅटर्नची निर्मिती दर्शवितो, जो सामान्यतः तेजीच्या उलटतेचा संकेत मानला जातो. मुख्य आधार २५,३०० वर आहे आणि जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर राहील तोपर्यंत तेजीची भावना कायम राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये जलद पुनरागमन होण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूस, निर्देशांक नजीकच्या काळात २५,८००-२६,१०० पर्यंत वाढू शकतो. तात्काळ प्रतिकार २५,५०० वर ठेवला आहे; या पातळीच्या वर ब्रेकआउटमुळे वरच्या गतीला आणखी बळकटी मिळू शकते.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'अमेरिकेच्या येणाऱ्या टॅरिफ डेडलाइनपूर्वी गुंतवणूकदारांनी वाट पाहा आणि पहा अशी रणनीती स्वीकार ल्यामुळे भारतीय बाजाराला मंदीचा अनुभव येत आहे आणि जागतिक संकेतही मिश्रित आहेत. चालू परदेशी गुंतवणूकदार (FII) आउटफ्लो जोखीम-बंद दृष्टिकोन दर्शवितात, तर घरगुती गुंतवणूकदार (DII) कडून होणारा प्रवाह अंशतः आधार देत आहे. अलीकडी ल तेजीनंतर, मुख्य निर्देशांक शिखर मूल्यांकन पातळीजवळ फिरत आहेत, ज्यामुळे आणखी वाढ मर्यादित आहे, जी पहिल्या तिमाहीतील कमाई आणि व्यापार कराराच्या तपशीलांवर अवलंबून आहे. मिड आणि स्मॉलकॅप जागेत,अलिकडच्या पुनर्प्राप्तीनंतर बाजार अधिक स्टॉक-विशिष्ट बनला आहे.'
बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,'निफ्टी निर्देशांक २५,४२८ वर सपाट पातळीवर उघडला, दिवसाच्या अंतर्गत उच्चांक २५,४५८ ला स्पर्श केला आणि २५,३३१ च्या नीचांकी पातळीवर घसरला. सलग ५ सत्रांच्या तोट्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ जुलै रोजी व्यापार शुल्क वाटाघाटीसाठी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी गुंतवणूकदार बाजूला राहिल्याने बाजार एकत्रीकरणाच्या टप्प्यात राहिला. क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती. फार्मा, आरोग्यसेवा, आयटी आणि तेल आणि वायू यांनी चांगली कामगिरी केली, तर धातू, उपभोग, ऑटोमोबाईल्स आणि खाजगी बँकांमध्ये दबाव दिसून आला. व्यापक बाजारातील भावना मंदावली राहिली. डेरिव्हेटिव्ह फ्रंट वर, TECHM, TRENT, BOSCHLTD, ANGELONE आणि BSE सारख्या शेअर्समध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट स्पर्ट दिसून आले. इंडेक्स ऑप्शन्सच्या बाजूने, कॉल साईडवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट बिल्डअप २५,५०० स्ट्राईकवर दिसून आला, तर २५,४०० आणि २५,००० स्ट्राईकने पुट साईडवर जास्तीत जास्त ओपन इंटरेस्ट राखला. पुट-कॉल रेशो (पीसीआर) ०.६६ वर होता, जो बाजारातील सहभागींमध्ये सावधगिरीचा इशारा देतो.'
यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता सोमवारी बाजारातील परिस्थिती क्षेत्रीय विशेष मर्यादीत न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरणावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बँक, व निफ्टी मिडकॅप निर्देशांकातील गती आगामी बाजाराची दिशा ठरवू शकते.