Saturday, October 25, 2025
Happy Diwali

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...
निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. आता निलेश साबळे आणि शरद उपाध्याय यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आता प्रेक्षक देखील यावर संतप्त झाले आहेत. आता विषय संपवा. अश्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी द्यायला सुरुवात केली आहे. राशीचक्रकार शरद उपाध्याय यांना 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर योग्य वागणूक मिळाली नसल्याची पोस्ट त्यांनी केली होती. शिवाय नीलेश साबळेने त्यांची विचारपूस देखील केली नाही असे देखील त्यात ते म्हणाले. या पोस्टमध्ये त्यांनी डोक्यात हवा गेली आहे, हकालपट्टी केली असे शब्द वापरले जे नीलेश साबळेला रुचले नाहीत. ते वाचून नीलेश साबळेने अतिशय आदरपूर्वक भाषेत प्रत्येक वाक्याला अनुसरून त्याची उत्तर दिली.त्यावर आता पुन्हा शरद उपाध्याय यांनी भाष्य केलं आहे. सुप्रभात मित्रमैत्रिणींनो,मी आणि नीलेशभाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झालात. ही फार अभिमानाची गोष्ट आहे.आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो,कारण त्यातून खूप शिकायला मिळते.वेळ मिळेल तशा पोस्टस् मी लिहीनच.आपण असेच व्यक्त होत रहा. असं म्हणत शरद उपाध्याय यांनी विषय गुंडाळला. परंतु प्रेक्षकांनी आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशा शब्दात शरद उपाध्याय यांच्यावर ताशेरे उडवायला सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा