Meta Infotech IPO: आजपासून कंपनीचा IPO दाखल पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद ९१% सबस्क्रिप्शन मिळवले 'इतकी' आहे GMP

  59

मुंबई: आजपासून मेटा इन्फोटेक लिमिटेड (Meta Infotech Limited) कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार होत आहे. हा आयपीओ बीएसई एसएमई (BSE SME), एनएसई इमर्ज (NSE Emerge) व्यासपीठावर उपलब्ध असणार आहे. ४ ते ८ जुलैपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. आयपीओतील माहितीनुसार, कंपनीने प्राईज बँड (Price Band) १५३ ते १६१ रूपये प्रति समभाग निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवण्याची कमीत कमी २४४८०० रूपये (१६०० शेअर्स) मोजावे लागणार आहेत. एकूण १२.४५ कोटींचा हा आयपीओ असणार असून गुंतवणूकीसाठी अर्ज करताना ८०० शेअरसाठी अर्ज करावा लागणार आहे. कंपनीचा आयपीओ आज उघडल्यावर सध्या शेअर्सची जीएमपी (Grey Market Price GMP) किंमत मुळ इश्यू किंमतीपेक्षा ४० रुपयांनी अधिक आकारली जात आहे.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५०४०० शेअर गुंतवणूकीसाठी आरक्षित केले आहेत. ज्यामध्ये त्यांना १० रूपयांची प्रति शेअर सवलत दिली जाणार आहे. Hem Securities Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. तर kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Hem Finlease Private Limited कंपनी काम करेल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप ९ जुलैला करण्यात येणार आहे. बाजारातील माहितीनुसार, कंपनी ११ जुलैला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. यामध्ये कंपनीने ६०.१३ कोटीचे समभाग ऑफर फॉर सेल (Offer For Sale OFS) ठेवण्यात आले आहेत.

एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ४.८२% वाटा आरक्षित करण्यात आलेला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ४४.६८%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १३.४३%, किरकोळ (Retail) गुंतव णूकदारांसाठी ३१.३०%, कर्मचाऱ्यांसाठी ०.९६% वाटा आरक्षित करण्यात आला आहे. कंपनीने आयपीओपूर्वीच २२.५८ कोटींची उभारणी आयपीओतून केली होती. वेणू गोपाल पेरूरी हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल ९४.९४% होते ते आयपीओनंतर ६८.९०% पर्यंत कमी होणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती -

बाजारातील माहितीनुसार, कंपनीला मार्च २०२४ मध्ये १५३.०५ कोटींचा महसूल मिळाला होता जो मार्च २०२५ मध्ये वाढत २२०.०२ कोटीवर गेला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये मार्च २०२४ मधील १०.५१ कोटींच्या तुलनेत वाढ होत कंपनीला २०२५ मार्चपर्यंत १४.५० कोटी रूपये मिळाले होते. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील १५.६९ कोटींच्या तुलनेत वाढ होत नफा २२.२४ कोटी रुपये मिळाला होता. कंपनीला आर्थिक वर्षात एकूण ४४% अधिक महसूल व ३८ % अधिक करोत्तर नफा मिळाला आहे. कंपनीचे सद्यस्थितीत एकूण बाजार भांडवल ३०३.९९ कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल -

१९९८ साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनीचा प्रमुख व्यवसाय सेवा क्षेत्रात (Service Sector) मध्ये आहे. सायबर सिक्युरिटी सेवा देणे, त्याची देखभाल करणे व नवीन उत्पादने बाजारात आणणे इत्यादी सायबर सोल्यूशन कंपनी देते. याशिवाय कंपनी कन्सल्टन्सी सेवा देखील पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भूतकाळातील आर्थिक थकबाकी चुकवण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.

आयपीओला पहिल्या दिवशी 'इतके' सबस्क्रिप्शन

आयपीओला पहिल्या दिवशी ९१% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बाजारातील रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपनीला ९१% सबस्क्रिप्शनसह पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (QIB २.१%), किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors १.१५ पटी ने हिस्सा सबस्क्राईब केला होता. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (NII) ने आतापर्यंत ०.८८ पटीने आयपीओ सबस्क्राईब केला आहे.
Comments
Add Comment

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Gold Silver Price Today: सोन्यात सहाव्यांदा धमाकेदार वाढ व चांदीत सलग दुसऱ्यांदा वाढ कायम ! 'हे' आहे विश्लेषण

मोहित सोमण: आज सोन्याच्या दरात सहाव्यांदा धमाकेदार वाढ व चांदीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली. काल सोन्यात मोठ्या