
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५०४०० शेअर गुंतवणूकीसाठी आरक्षित केले आहेत. ज्यामध्ये त्यांना १० रूपयांची प्रति शेअर सवलत दिली जाणार आहे. Hem Securities Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. तर kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Hem Finlease Private Limited कंपनी काम करेल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप ९ जुलैला करण्यात येणार आहे. बाजारातील माहितीनुसार, कंपनी ११ जुलैला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. यामध्ये कंपनीने ६०.१३ कोटीचे समभाग ऑफर फॉर सेल (Offer For Sale OFS) ठेवण्यात आले आहेत.
एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ४.८२% वाटा आरक्षित करण्यात आलेला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ४४.६८%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १३.४३%, किरकोळ (Retail) गुंतव णूकदारांसाठी ३१.३०%, कर्मचाऱ्यांसाठी ०.९६% वाटा आरक्षित करण्यात आला आहे. कंपनीने आयपीओपूर्वीच २२.५८ कोटींची उभारणी आयपीओतून केली होती. वेणू गोपाल पेरूरी हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल ९४.९४% होते ते आयपीओनंतर ६८.९०% पर्यंत कमी होणार आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती -
बाजारातील माहितीनुसार, कंपनीला मार्च २०२४ मध्ये १५३.०५ कोटींचा महसूल मिळाला होता जो मार्च २०२५ मध्ये वाढत २२०.०२ कोटीवर गेला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये मार्च २०२४ मधील १०.५१ कोटींच्या तुलनेत वाढ होत कंपनीला २०२५ मार्चपर्यंत १४.५० कोटी रूपये मिळाले होते. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील १५.६९ कोटींच्या तुलनेत वाढ होत नफा २२.२४ कोटी रुपये मिळाला होता. कंपनीला आर्थिक वर्षात एकूण ४४% अधिक महसूल व ३८ % अधिक करोत्तर नफा मिळाला आहे. कंपनीचे सद्यस्थितीत एकूण बाजार भांडवल ३०३.९९ कोटी रुपये आहे.
कंपनीबद्दल -
१९९८ साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनीचा प्रमुख व्यवसाय सेवा क्षेत्रात (Service Sector) मध्ये आहे. सायबर सिक्युरिटी सेवा देणे, त्याची देखभाल करणे व नवीन उत्पादने बाजारात आणणे इत्यादी सायबर सोल्यूशन कंपनी देते. याशिवाय कंपनी कन्सल्टन्सी सेवा देखील पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भूतकाळातील आर्थिक थकबाकी चुकवण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.
आयपीओला पहिल्या दिवशी 'इतके' सबस्क्रिप्शन
आयपीओला पहिल्या दिवशी ९१% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बाजारातील रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपनीला ९१% सबस्क्रिप्शनसह पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (QIB २.१%), किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors १.१५ पटी ने हिस्सा सबस्क्राईब केला होता. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (NII) ने आतापर्यंत ०.८८ पटीने आयपीओ सबस्क्राईब केला आहे.