मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स असतात. कंपनी स्वस्त तसेच महाग अनेक ऑफर करत असते.
१९८ रूपयांचा प्लान
जर तुम्हाला अधिक डेटावाला शॉर्ट टर्म प्लान हवा असेल तर कंपनीचा १९८ रूपयांचा रिचार्ज प्लान पाहू शकता. यात तुम्हाला डेटासह कॉलिंग आणि एसएमएस वापरण्यास मिळेल.
हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे शॉर्ट टर्मसाठी दररोज २ जीबी डेटा प्लान हवा असेल. यात तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लान १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच तुम्हाला एक व्हॅलिडीटीमध्ये २८ जीबी डेटा मिळेल.
याशिवाय तुम्हाला यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. हा प्लान अनलिमिटेड ५जी डेटासोबत येतो. म्हणजेच तुमचे ५ जी नेटवर्क आहे आणि तुमच्याकडे ५जी फोन आहे. याअंतर्गत कंपनी अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर करते.
याशिवाय तुम्हाला यात जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात अतिरिक्त तुम्हाला आणखी काही या प्लानमध्ये मिळणार नाही.