CII अध्यक्ष राजीव मेमानी यांचे वक्तव्य
प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था ६.४% ते ६.७% वाढणार असे वक्तव्य सीआयआयचे (Confederation of Indian Industry CII) अध्यक्ष राजीव मेमानी यांनी केले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्था अनेक कारणांमुळे वाढू शकते. ज्यामध्ये आधारभूत ठरणारा मान्सून, वाढलेली तरलता (Liquidity), आरबीआयने केलेली सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) मध्ये केलेली कपात यांचा समावेश आहे. सीआरआर मध्ये १०० बीपीएसने केलेल्या कपातीमुळे योग्य कारणासाठी अतिरिक्त २.५ लाख कोटींची बाजारात आवक होणार आहे. बेंचमार्क व्याजदरातही कपात केल्यामुळे (50 BPS) बाजारात याचा फायदा होईल' असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले. दिल्लीत सीआयआयचा कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारापेठेत मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक होत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मेमानी यांनी जागतिक स्तरावरील राजकीय भौगोलिक स्थितीवर देखील भाष्य केले ते म्हणाले, ' जागतिक आर्थिक आणि राजकीय अस्थिरता गेल्या दोन दशकांमधील सर्वोच्च पातळीवर असताना, वाढत्या प्रमाणात विस्कळीत होत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक उज्ज्वल स्थान म्हणून उभा आहे.' पण ते सुधारणा, नवोपक्रम आणि विश्वास याद्वारे मिळवले पाहिजे. ते पुढे म्हणाले,' भारताचा आत्मविश्वासू, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर जोडलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला गती देण्यासाठी सरकार, उद्योग आणि नागरिकांसोबत काम करण्यास सीआयआय वचनबद्ध आहे," असे ते म्हणाले. भारताची अंतर्गत गती बाह्य धक्क्यांना तोंड देण्याइतकी मजबूत आहे असे ते म्हणाले.
व्यापार आणि तंत्रज्ञानाचे नियम वेगाने बदलत असताना, आपण भारताच्या वाढीला स्पर्धात्मकतेत, प्रमाण, उत्पादकता, नवोपक्रम आणि लवचिकतेमध्ये बळकटी दिली पाहिजे. हा आपला क्षण आहे. परंतु ते मिळवण्यासाठी आपण निर्णायकपणे कृती केली पाहिजे असेही पुढे म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून पर्यावरणीय नियम सुव्यवस्थित आणि सुधारित केले पाहिजेत. सर्व राज्य आणि केंद्र पर्यावरणीय मंजुरी एकत्रित करणारी एकीकृत अनुपालन चौकट लागू करण्याची शिफारस सीआयआय करते, असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले.
चीन, अमेरिका, ब्रिटन आणि युरो क्षेत्रासारख्या देशांच्या तुलनेत भारताने अधिक आर्थिक लवचिकता कशी दाखवली आहे, विकासाचे दीपस्तंभ कसे राहिले आहे याबद्दलही त्यांनी सांगितले.