सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

  28

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार


मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आलेल्या सीआरआय कंपनीच्या सोलार पंपाच्या तक्रारीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनीही सहभाग घेतला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देशातील ५० टक्के वीज अपारंपरिक स्त्रोतांतून निर्मित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्याला अनुसरून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातही सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले असून मागेल त्याला सौर पंप देण्याची योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे सौर पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जात असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले.


चंद्रपूर जिल्ह्यात सी.आर.आय. कंपनीमार्फत लावण्यात आलेल्या सौर कृषी पंपांबाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कंपनीला १३ लाखाचा दंडही करण्यात आला असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी यावेळी सांगितले. या कंपनीच्या सौर कृषी पंपांबाबत १८३ शेतकऱ्यांनी ५४४ तक्रारी नोंदवल्या होत्या. यातील ५४२ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, उर्वरित दोन तक्रारी पाण्याचा स्त्रोत कोरडा झाल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. जिथे पाण्याची पातळी खालावली आहे, अशा ठिकाणी बुस्टर पंप बसवून नदी किंवा जलस्रोतांमधून शेतापर्यंत पाणी पोचविण्यात येत आहे, असेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘जय गुजरात’: पवारांचा दाखला देत फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' या घोषणेमुळे तापले आहे.

जसलोक हॉस्पिटलने टर्मिनल प्रोस्टेट कर्करोगाने पीडित रूग्‍णाचे प्राण वाचवले

७००० पेक्षा कमी प्‍लेटलेट असलेल्‍या रुग्णावर ल्‍युटेशियम थेरपी करत रचला इतिहास  मुंबई: प्रगत कर्करोग

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा