Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण! सलग तीनदा वाढलेल्या सोन्याचा पुन्हा 'युटर्न' काय आहे बाजारातील परिस्थिती गुंतवणूकदारांनो जाणून घ्या !

प्रतिनिधी: तीन वेळा सलग वाढलेल्या सोन्याच्या दराने पुन्हा 'युटर्न' घेतला आहे. आज सोने तेजीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत ६० रूपयाने घसरण झाली. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत ५५ रूपयांनी घसरण होत १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीतही ४५ रुपयांनी घसरण झाली आहे.परिणामी २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८७३ रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९०५० रूपये, १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७४०५ रूपये आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमत ६०० रूपयांनी घसरत ९८७३० रूपये पातळीवर पोहोचले आहे. २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ५५० रूपयांनी घसरत ९०५०० रूपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४५० रूपयांनी घसरत ७४०५० रुपये पातळीवर पोहोचले.


आज मुंबई, पुणे यांसारख्या महत्वाच्या शहरातील सराफा बाजारात दर २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८७३ रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९०५० रूपये, १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७४७० रूपयावर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड फ्यु चर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये सकाळी ०.२७% वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट (Gold Spot Price) यामध्ये ०.२६% वाढ सकाळपर्यंत झाली. भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स वर (MCX) सोन्याच्या निर्देशां कात सकाळपर्यंत ०.२६% वाढ झाली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे पूर्वी वाढलेला अमेरिकन डॉलर निर्देशांक आता जगभरात कमकुवत होण्याची चिन्हे दाखवत आहे. त्याने सलग दुसऱ्या आठवड्यात तोटा नोंदवला, ज्यामुळे डॉलर नसलेल्यांसाठी सोने स्वस्त झाले. जुलैमधील अमेरिकन डॉलर-भारतीय मुद्रांक ८५.४२२५ वर बंद झाला होता. अमेरिका-भारत व्यापार करार आणि देशांतर्गत शेअर बाजारातील वाढ या संभाव्य आशावादामुळे सोन्याचा दर नियंत्रित झाला होता. मात्र पुन्हा मागणीत वाढ तसेच सोन्यातील गुंतवणूकीत वाढ झाल्यानंतर सोने महागले होते. मात्र युएस डॉलर घडल्यानंतर सोन्याच्या दराला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली. याशिवाय सलग तीनदा सोने वाढल्यानंतर वाढलेला पुरवठा व घटलेली मागणी यामुळे भाववाढ नियंत्रित होऊन सोन्याच्या किंमती आज घसरल्या आहेत.


युएस पेरोल डेटा,विना शेती रोजगार आकडेवारी बाजारात अपेक्षित असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक 'होल्ड' वर टाकली ज्यामध्ये सोन्यातील गुंतवणूकीचाही समावेश आहे. मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात सत त घसरण झाली होती. युएस फेडरल व्याजदरात कपात कधी होईल व युएस भारत डील याकडे बाजाराचे लक्ष असताना पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार अपेक्षित आहे.


चांदीच्या दरातही मोठी घसरण !


सोन्याच्या दरातील घसरणीप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली आहे.प्रति ग्रॅम किंमतीत १ रुपये स्वस्त झाल्याने १ किलो चांदीची किंमत प्रति १००० रूपयाने घटली. त्यामुळे एकूण १ किलो चांदीची किंमत ११०००० रूपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह इतर महत्वाच्या शहरातील सराफाबाजारात चांदीची किंमत प्रति किलो ११०००० रूपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सिल्वर फ्युचर निर्देशांक (Silver Future Index) यामध्ये ०.११% घसरण झाली होती. तर एमसीएक्सवरील चांदीच्या नि र्देशांकात सकाळपर्यंत ०.१०% घसरण झाली. चांदीतही घटत्या मागणीबरोबरच चांदीचा पुरवठा मुबलक आहे. सोन्याच्या बरोबरच चांदीच्या गुंतवणूकीत घट झाल्याने दर कमी झाले.


अमेरिकेतील नव्या महसूल धोरणात बदल झाल्याने सुधारित परिस्थिती गुंतवणूकदारांनी सोन्याच्या अस्थिरतेपासून वाचण्यासाठी मागणीही घटवली ह्यामुळेच सोन्याच्या चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारची कर्मचाऱ्यांचे पगार दणदणीत वाढणार वेतन आयोगाकडे 'या' मोठ्या शिफारशी

प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

Shocking Case in Lucknow : पत्नीला तलाक पाहिजे होता म्हणून पतीला...लखनऊमधील विचित्र घटना

लखनऊ : उतर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे. एका महिलेने पतीकडून घटस्फोट मिळवता यावा

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे