
मराठी आणि हिंदीवरून वाद सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण केले. यावेळी भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र असे म्हंटले आणि तेथून जाणार तेवढ्यात खाली वाचून त्यांनी पुढे जय गुजरात असा नारा दिला. यावरून आता वाद सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे.