कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ मिळुन आलेल्या दाखल गुन्हयातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळुन जात असताना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथुन अटक करण्यात आली.
मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात आरोपी असिल जाबर सुर्वे आणि मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी व मेहेर फातिमा रिजवान देवजानी या महिलेसह तीन आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आली होती. या गुन्हयातील मुख्य आरापी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. २९ जून रोजी या गुन्हयातील मुख्य आरापी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरान हा बाहेरील देशात पळून जात असताना त्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथे ताब्यात घेवून अटक करण्यात आली. मोहम्मद शेख हा वेगवेगळ्या देशात जात असल्याची माहिती मिळत असून त्याच्या विरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक राम चोपडे, सपोनि कलगोंडा पाटील, संपत फडोळ यांच्या पथकाने केली आहे.