
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळी 'प्रहार' ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुन्हा बाजारात जागतिक स्तरावरील फटका बसला. त्यामुळे बाजार आज 'लाल' रंगात बंद झाला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील टेरिफ वाढीच्या मुद्यांवर बाजारात अस्वस्थता कायम असल्याने बाजारात पडझड झाली. सेन्सेक्स २७२.५५ अंकाने घसरत ६३४१८.२२ अंकावर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांकात ४८.१० अंकांने घसरण होत निर्देशांक २५४०५.३० अंकांवर स्थिरावला आहे. प्रामुख्याने आज सकाळप्रमाणेच किंबहुना अखेरच्या सत्रात अधिक प्रमाणात घसरण झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २७२.५५ अंकांने घसरण होत बँक सेन्सेक्स ६३४१८.२२ पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टी २०५.२५ अंकाने घसरत ५६७९१.९५ पातळीवर पोहोचला आहे. सकाळप्रमाणेच बँक सेन्सेक्स तुलनेत बँक निफ्टीची घसरण अधिक प्रमाणात झाली व अस्थिरही राहिली.
सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.०६% अंकाने घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.४७% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१२%,०.०३% वाढ झाली आहे. विशेषतः आज सकाळी १% हून अधिक असणारा अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) अखेरीस ०.४८% वर बंद झाला आहे. बाजारातील अस्थिरता कायम असली तरी प्रामुख्याने दुपारी १ ते ३ दरम्यान ती सर्वाधिक होती. आज निफ्टी उच्चांक २५५८७.५० तर निचांकी पातळी २५३८४.३५ होती. आज सेन्सेक्स व निफ्टीत मार्जिनल घट झाली असली किंवा वीआयएक्सची घसरण थोडक्यात अटोपली असली तरी भविष्यातील घसरणीचा धोका अजून टळलेला नाही.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये आजही क्षेत्रीय विशेष प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७८%), हेल्थकेअर (०.५२%), मिडस्मॉल फायनाशियल सर्विसेस (०.२३%), मिडिया (१.४५%), ऑटो (०.४४%) समभागात झाली तर सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.८९%), खाजगी बँक (०.४६%), मेटल (०.७८%), फायनांशियल सर्विसेस (०.६१%) समभागात झाली आहे.
भारतातील तिमाहीतील निकालावर येणारे परिणाम, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव पातळी, अमेरिकन बाजारातील ट्रेड संदर्भात अस्थिरता, भारत व युएस यांच्यातील ट्रेडबदल अस्पष्टता, आज डॉलरचा तुलनेत घटणारा रुपया, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख रक्कम मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याची शक्यता, घरगुती गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता, सोन्याचे चढते दर, युएस बाजारातील आगामी पेरोल आकडेवारी अशा अनेक एकत्रित कारणांमुळे बाजारात आज घसरण झाली. आज कदाचित नफा बुकिंग होण्याची शक्यता होती. विशेषतः क्षेत्रीय विशेष समभागातील कामगिरीवर आधारित हालचाली बाजारात घडल्या असाव्यात.
याशिवाय अमेरिका-व्हिएतनाम व्यापार करारानंतर, प्रादेशिक आशियाई बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, ज्यामुळे भारतीय बेंचमार्क सावधपणे उघडण्यास मदत झाली मात्र दुपारनंतर बाजाराने उलटा प्रवास सुरू केल्याने सपोर्ट लेवला मिडकॅप व स्मॉलकॅप, बँक निर्देशांक,फायनांशियल समभाग वाचवू शकले नाहीत. ही प्रामुख्याने बाजारातील अस्थिरता, चढउतार अधोरेखित करते. ऐतिहासिक अमेरिका-व्हिएतनाम कराराच्या पार्श्वभूमीवर,अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमध्ये चांगल्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांचा आशावाद स्थानिक पातळीवर बळकट झाला आहे. तथापि, आशियाई बाजारातील चिनी डेटामधील कमकुवतपणा आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणावरील सावधगिरीमुळे नफा मर्यादित आहे. कदाचित आधी म्हटल्याप्रमाणे नफा बुकिंगची शक्यता अधिक आहे. जागतिक स्तरावर, आजच्या सुरुवातीच्या सत्रात आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण होते परंतु जागतिक व्यापाराबद्दल आशावाद आणि फेडच्या कारवाईच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे.
जागतिक स्तरावरील संकेतांमुळे कथा प्रवाहावर परिणाम झाला आहे, ज्यामध्ये नायका (Nykaa) ची कॉर्पोरेट शेअर विक्री आणि मजबूत Q1 तिमाही प्रोव्हिजनल कमाई अपडेट यांचाही प्रभाव बाजारात पडला होता. बीएसईतील ४१६८ सम भागात २००९ समभागात वाढ झाली आहे तर २००१ समभागात घसरण झाली. एनएसईत ३०२५ समभागात १४५० समभागात वाढ झाली आहे तर १४७२ समभागात घसरण झाली आहे. बीएसईचे आजचे बाजार भांडवल (Market Capitali sation) ४६०.३१ कोटी तर एनएसईचे बाजार भांडवल ४५८.३४ कोटी होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकातही संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाली होती. तर चांदीच्या निर्देशांकात तर १.०२% वाढ झाली होती. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.२१% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात ०.३२% घसरण झाली आहे.
अमेरिकन बाजारातील फेडरल व्याजदराच्या कपातीवरील नव्या वक्तव्यांची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांनी सुरूवातीच्या कलात लाभांश जाहीर केल्यानंतर उत्साह दर्शविला आहे. डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.४७%), नासडाक (०.९४%) तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. तसेच युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.३२%), डीएक्स (DAX ०.११%) वाढ झाली आहे तर सीएससी (०.१९%) समभागात घसरण झाली. आशियाई बाजारातील बहुतांश बाजारात वाढ दर्शविली गेली. व्हिएतनाम बरोबर झालेल्या मंजूरी धोरणामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. आशियाई बाजारातील निकेयी २२५ (०.०६%), स्ट्रेट टाईम्स (०.२२%), तैवान वेटेड (०.६०%), कोसपी (१.३२%), शांघाई कंपोझिट (०.१८%) बाजारात वाढ झाली आहे. तर जकार्ता कंपोझिट (०.०५%), हेंगसेंग (०.६३%) बाजारात घसरण झाली आहे.
अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ डीसीएम श्रीराम (१५.१५%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (८.५७%), ब्लू स्टार (४.९१%),ऑईल इंडिया (३.९१%), सीसीएल प्रोडक्ट (३.४२%), अजंता फार्मा (३.२४%), बोसच (Bosch ६.०४%), अपोलो हॉस्पिटल एंटरप्राईज (१.६७%), डॉ रेड्डीज (१.६१%), ओएनजीसी (१.२४%), पिडिलाईट इंडस्ट्रीज (१.२३%), जेल इंडिया (१.०४%), मारूती सुझुकी इंडिया (१.०३%),डाबर इंडिया (०.८३%), सिमेन्स (०.७१%), इटर्नल (०.४२%), टाटा मोटर्स (०.२७%),आयटीसी (०.१०%), ब्रिटानिया (०.०८%) या समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण एफएसएन इ कॉमर्स (४.५१%), पंजाब नॅशनल बँक (३.२१%), आयसीआयसीआय प्रोडुंशियल (२.७९%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (२.७२%), चोलामंडलम फायनान्स (२.६५%), वेदांता (२.०४%), बंध न बँक (२.०१%), कोरोमंडलम इंटरनॅशनल (१.६२%), अनंत राज (१.४२%), आयडीबीआय बँक (१.३६%), जेएसबब्लू एनर्जी (१.४२%), जिंदाल स्टील (१.३४%), ओला इलेक्ट्रिक (१.०७%), इंटरग्लोब एव्हिएशन (३.१९%), लोढा डेव्हलपर (२.१४%), टाटा पॉवर (१.६६%), एलआयसी (१.२५%), अदानी ग्रीन (१.०३%), इंडियन हॉटेल्स कंपनी (१.०३%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,' गुरुवारी निफ्टी निर्देशांक २५,५०५ वर स्थिर होता, जो दिवसाच्या आत २५,३८४ च्या नीचांकी पातळीवर घसरला आणि नंतर तो २५,५८७ च्या उच्चांकावर पोहोचला. तथापि, सत्राच्या दुसऱ्या सहामाहीत निर्देशांकात दिवसाच्या उच्चांकावरून पुन्हा विक्रीचा दबाव दिसून आला, जो शेवटी मंदावला. क्षेत्रीयदृष्ट्या, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑटोमोबाईल्समध्ये चांगली कामगिरी दिसून आली, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका,धातू आणि रिअल्टी समभागांमध्ये लक्षणीय कमकुवतपणा कायम राहिला. अपेक्षित अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आधी गुंतवणूकदार बाजूला राहिल्याने, एकूण भावना मंदावल्या गेल्याने बाजारातील व्यापक मूड सावध राहिला. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, बाजाराची व्याप्ती नकारात्मक राहिली, ९६ समभागांनी प्रगती केली आणि १३३ समभाग घसरले. बॉश लिमिटेड, ब्लू स्टार, ३६० वन डब्ल्यूएएम, नायका आणि डी-मार्टमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जी या काउंटरमध्ये सक्रिय सहभाग आणि स्थिती दर्शवते.'
आजच्या बाजारातील जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' गेल्या आठवड्यातील तीव्र तेजीनंतर नफा बुकिंग सुरूच राहिल्याने देशांतर्गत शेअर बाजार मजबूत होत राहिला. ९० दिवसांच्या विरामाच्या समाप्तीसह, गुंतवणूकदार संभाव्य अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आसपासच्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. प्रीमियम मूल्यांकनामुळे अलिकडच्या काळात एफआयआय सावध झाले आहेत. या अडचणी असूनही, आगामी कमाई हंगामाभोवती आशावाद आणि कमकुवत होत चाललेल्या अमेरिकन डॉलर निर्देशांकामुळे भावनांना पाठिंबा आहे.'
बाजारातील सोन्याच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सोन्याच्या किमती ९७,००० ते ₹९७,७५० रूपयांच्या आत चढ-उतार झाल्यामुळे सोन्याचा भाव कमकुवत आणि अस्थिर झाला, याचे मुख्य कारण ८५.५० ते ८५.३० च्या पातळीवरील रुपयाचे मूल्य वाढणे होते, ज्यामुळे जागतिक संकेत असूनही देशांतर्गत किमतींवर परिणाम झाला. बाजार आता आज संध्याकाळी अमेरिकेतील महत्त्वाच्या डेटा रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये नॉन-फार्म पेरोल्स (NFP) आणि बेरोजगारीचे आकडे समाविष्ट आहेत, जे नवीन दिशा देऊ शकतात. पुढे जाऊन, सोन्याचा व्यापार ९५,५०० ते ९८,५०० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत होण्याची अपेक्षा आहे.'
एकूणच बाजारातील स्थिती पाहता बाजारात जशी तेजीची शक्यता आहे तशी अस्थिरताही कायम आहे. आगामी अमेरिकन ट्रेडवर आधारित निर्णयावर व स्मॉलकॅपमध्ये, बँक निर्देशांकात होणारी हालचाल पाहता पुढील बाजाराची दिशा स्पष्ट होणार आहे. तज्ज्ञांकडून अशावेळी क्षेत्रीय कामगिरीसह आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.