
अमेरिकन बाजारातील रेसिप्रोकल (Reciprocal) टेरिफ वाढीची अंतिम मुदत ९ जुलैला संपत आहे. भारत व व्हिएतनाम यांच्यातील व्यापारी बोलणी यशस्वी झाली असली तरी अद्याप भारतीय व अमेरिकन ट्रेडिंग डीलचे घोडे अडले आहे. आतापर्यंत अमेरिकेने चीन, इंग्लंड, व्हिएतनाम यांच्याशी यशस्वीपणे बोलणी पार पाडली आहे. यामुळेच गुंतवणूकदारांना चिंता कायम आहे. किंबहुना अमेरिकन बाजारातील रोजगार डेटा (बेरोजगारी प्रमाण डेटा) जाहीर होणार आहे. याच अनुषंगाने फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात इतक्यात कपात होईल का याची नांदी निश्चित होणार असल्याने त्याचा संमिश्र परिणाम सुद्धा काल आशियाई बाजारात झाला होता.
सेन्सेक्स बँक निर्देशांकात घसरण कायम राहत १७.१३ अंकाने निर्देशांकात घसरण झाली आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात २.२० अंकाने वाढ झाली होती. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ' युटर्न ' मारत आज वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप ०.१०%, स्मॉलकॅप निर्देशांक (०.११%) वाढला आहे. निफ्टी मिडकॅप (०.२५%) व स्मॉलकॅप (०.२१%) वाढला आहे. आज बाजारातील ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात (शेअर्स) संमिश्र प्रतिसाद अथवा दबाव राहण्याची शक्यता असली तरी मिडकॅप व स्मॉलकॅपमधील तेजी बाजारातील फंडामेंटल अजूनही अनुकूल असल्याची प्रचिती देत आहे. विशेषतः आज ऑटो, फायनांशियल सर्विसेस, बँक निर्देशांक, आयटी, टेलिकॉम, हेल्थकेअर समभागात बाजाराचा फोकस असू शकतो.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक वाढ विशेषतः मिडकॅप १५० (०.३२%), स्मॉलकॅप ५० (०.३२%),ऑटो (०.८०%), मेटल (०.८१%), आयटी (०.४९%), हेल्थकेअर (०.३०%) निर्देशांकात झाली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.१७%), खाजगी बँक (०.०९%), मिडिया (०.१०%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.१२%) समभागात झाली.
भारतीय बाजारपेठा दिवसाची सुरुवात सावधपणे हे जागतिक Nykaa ची कॉर्पोरेट शेअर विक्री आणि मजबूत Q1 तिमाही निकाल प्रोव्हिजनल कमाई अपडेट यांचाही बाजारात प्रभाव पडू शकतो. त्याचा निर्देशांकात किती परिणाम होईल हे बाजाराच्या अखेरच्या सत्रातच कळू शकते.
काल अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.४७%), नासडाक (०.९४%) या तिन्ही बाजारात व्हिएतनाम डीलनंतर वाढीचे संकेत मिळत होते. युरोप बाजारात मात्र एफटीएसई (०.१२%) बाजारात घसरण झाली तर सीएससी (०.९८%), डीएक्स (DAX ०.४९%) बाजारात वाढ झाली होती. आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी वगळता निकेयी (०.०७%), तैवान वेटेड (०.९३%), कोसपी (०.९०%),सेट कंपोझिट (०.१०%), जकार्ता कंपोझिट (०.२५%), शांघाई कंपोझिट (०.०७%) बाजारात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ अँस्टर डीएम हेल्थ (५.१९%), कोरोमंडल इंटरनॅशनल (४.२%), विजया डायग्नोस्टिक्स (२.२९%), नाटको फार्मा (२.२३%), सीपीसीएल (२.१३%), सीबीएफसी फायनान्स (१.८५%), जिंदाल स्टील (१.६३%), गुजरात गॅस (१.३७%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (१.३७%), जेल इंडिया (१.२६%),एशियन पेंटस (१.१९%), सुंदरम फायनान्स (१.०२%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (०.१९%), ओएनजीसी (१.२०%), टीव्हीएस मोटर्स (१.०८%), हिंदाल्को (०.९३%), हिरो मोटोकॉर्प (०.८३%), पीडिलाईट (०.७८%) समभागात झाली आहे.
सर्वाधिक घसरण एफएसएन इ कॉमर्स (३.८७%), अव्हेन्यू सुपरमार्ट (३.५५%), रेमंड (३.३६%), भारत डायनॅमिक्स (२.९३%), टाटा पॉवर (२.२१%), कल्याण ज्वेलर्स (१.८६%), जेपी पॉवर (१.८१%), जे एम फायनांशियल (१.८१%), कोटक महिंद्रा बँक (१.७४%), इंटरग्लोब एव्हिएशन (१.०७%), चोलामंडलम फायनान्स (१.५७%), हिताची एनर्जी (१.४५%), बजाज फायनान्स (१.४१%), पंजाब नॅशनल बँक (१.४१%), क्रिसील (१.०८%), बजाज फिनसर्व्ह (०.८६%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.६७%), अदानी पॉवर (०.६३%), अदानी एंटरप्राईजेस (०.५९%), जेएसबब्लू एनर्जी (१.५७%), होंडाई मोटर्स (१.४७%), टोरंट फार्मास्युटिकल (०.९३%), वेदांता (०.३५%) समभागात झाली आहे.
बाजारातील कलावर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' निफ्टी आणखी काही काळ २५२००-२५८०० च्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे, जोपर्यंत एखादा ट्रिगर ही श्रेणी तोडत नाही. काही दिवसांत जाहीर होणाऱ्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे सकारात्मक ट्रिगर येऊ शकतो. अमेरिका-व्हिएतनाम व्यापार करार हे दर्शवितो की अमेरिकन प्रशासन शक्य तितके व्यापार करार करण्याची उत्सुकता बाळगत आहे कारण EU आणि जपानसोबत लवकरच करार होण्याची शक्यता कमी आहे.
अमेरिकेतील काही अलीकडील आकडेवारीवरून रोजगारांच्या बाबतीत नकारात्मक बातम्या दिसून येतात. यामुळे अमेरिकेतून अधिक भांडवल बाहेर पडू शकते आणि डॉलर आणखी कमकुवत होऊ शकतो, जो या वर्षी आधीच १०% पेक्षा जास्त घसरला आहे. भारतासारख्या EM साठी ही चांगली बातमी आहे. परंतु आव्हान म्हणजे भारतातील कमाईची मंद वाढ आणि FY26 मध्ये केवळ माफक कमाई वाढीचे संकेत. कमकुवत सूक्ष्म आणि उच्च मूल्यांकने पाहता, बाजाराला श्रेणीच्या वरच्या टोकापासून वर येण्याच्या प्रयत्नात अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल.'