Maharashtra Assembly 2025: "तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावे"

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी


मुंबई: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४  वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही, ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition Leader Ambadas Danve) यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी दानवे यांनी केली.

राज्यात मागील काही काळात पुणे जिल्ह्यातील माळीण गाव,रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये व कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्यूमुखी पडल्यानंतरही सरकारने याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

दरडग्रस्त तळीये गावात दरड कोसळून ६६ लोकांचा मृत्यू झाला असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले होते. आतापर्यंत फक्त ६६ कुटुंबांना घरे मिळाली असून बाकीचे कुटुंब अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. सदर ठिकाणी अजूनही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणीही दानवे यांनी केली.

या पावसाळ्यात या दरडग्रस्त भागात अशाच काही घटना घडण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त करत आज म.वि.प. नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधान परिषद सभागृहात सूचना केली.
Comments
Add Comment

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा झालेले फोन कॉल ?

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा फोन कॉल झाल्याचा

अमित ठाकरेंकडे पुणे, यशवंत किल्लेदारांकडे कोल्हापूर

मनसेकडूनही जिल्हा संपर्क अध्यक्षांची घोषणा मुंबई : शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्हावार

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या' पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून,

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १०९ डॉलरच्या पुढे

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार होत आहेत.