
कन्नड तहसील कार्यालयात नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक दुपारी मोठा आवाज ऐकू आला. घाबरलेल्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने बघितले. त्यावेळी कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळत असल्याचे नागरिकांना दिसले. अनेकांच्या डोळ्यांसमोर इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन कोसळली. इमारतीचा जो भाग कोसळला त्या भागातील सर्व रहिवासी आणि दुकानदार स्थलांतरित झाले होते. काही दुकानं बंद होती. यामुळे जीवितहानी झालेली नाही.
इमारत पडत असतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात इमारत कोसळताच मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याचे दिसते. इमारत कोसळत असल्याचे बघून घाबरलेले नागरिक आणि त्यांची धावपळ पण व्हिडीओत दिसत आहे.