
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विमान अपघात झाला आहे. दक्षिण न्यू जर्सी येथील विमानतळावर एक छोटे स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीवरून घसरले. विमान जंगली भागात कोसळले.
अपघातानंतर किमान १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते सेस्ना २०८बी मॉडेलच्या विमानात १५ जण होते.
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झालेल्या विमान अपघाताबाबतफेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, टेकऑफ दरम्यान. एक छोटे स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीच्या शेवटी घसरले. क्रॉस कीज विमानतळावरील या अपघाताबाबतअधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान जंगली भागात कोसळले. हा अपघात फिलाडेल्फियाच्या आग्नेयेस सुमारे ३३.८ किलोमीटर अंतरावर घडला.
अपघातग्रस्त विमानाची हवाई दृश्यही समोर आले आहे. विमानाजवळ अनेक ढिगाऱ्यांचे तुकडे दिसत आहेत.
मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर आपत्कालीन वाहने देखील घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. जखमींना न्यू जर्सी येथील कूपर युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आठ जणांना कमी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत.