Thursday, July 3, 2025

जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानच्या मुफ्ती हबीबुल्ला हक्कानीची हत्या

जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानच्या मुफ्ती हबीबुल्ला हक्कानीची हत्या
बरवाल :  पाकिस्तानमधील अप्पर दिरच्या बरवाल बेंद्रा भागात 'जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तान'च्या मुफ्ती हबीबुल्ला हक्कानीची घरात घुसून हत्या करण्यात आली. हबीबुल्ला हक्कानी मूलतत्ववादी विचारांचा नेता होता. हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात हबीबुल्ला हक्कानी ठार झाला आणि त्याची पत्नी जखमी झाली. हबीबुल्ला हक्कानीच्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. तपास पथकाने अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती दिली. तर जमियत उलेमा-ए-इस्लाम पंजाबचे अमीर, जामिया मदनिया जदीदचे प्रमुख मौलाना सय्यद मेहमूद मियांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर काही आठवड्यातच हबीबुल्ला हक्कानीची अज्ञातांनी हत्या केली आहे. हा पाकिस्तानच्या भारतविरोधी अतिरेकी कारवायांना मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.

'जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तान' ही एक जहाल मूलत्ववादी विचारांची संघटना आहे. इस्लामचा प्रचार प्रसार करणे आणि धर्मयुद्ध लढण्याच्या नावाखाली अतिरेकी तयार करुन भारताविरोधात वापरणे हे जमियतचे प्रमुख काम आहे. यामुळे जमियतशी संबंधित महत्त्वाच्या नेत्याच्या हत्येने अतिरेक्यांच्या कारवायांना धक्का बसल्याची चर्चा आहे.
Comments
Add Comment