
एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या पहिल्या डावात द्विशतक ठोकले आहे. शुभमन इंग्लंडमध्ये कसोटीत द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. शुभमनचे कसोटी करिअरमधील हे पहिले द्विशतक आहे.
आता शुभमन परदेशी धरतीवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळणारा भारताचा कर्णधार ठरला आहे. शुभमनने विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीने जुलै २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नॉर्थसाऊंड कसोटीत २०० धावा केल्या होत्या. शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वात मोठी खेळणारा भारताचा कर्णधार ठरला आहे. गिलने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. अझरुद्दीनने ऑगस्ट १९९० मध्ये मँचेस्टर कसोटी सामन्यात १७९ धावांची खेळी केली होती.
शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारताचा फलंदाज ठरला आहे. शुभमनने २२२ धावा करताच सुनील गावस्करना मागे टाकले आहे.
भारतीय कसोटी कर्णधाराच्या रूपात द्विशतक
७- विराट कोहली
१- मन्सूर अली खान पटौदी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, शुभमन गिल
शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. जडेजाने गिलला चांगली साथ दिली. जडेजाला या सामन्यात ८७ धावा करता आल्या.