इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली

बाली : पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या इंडोनेशियात बालीजवळ ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता आहेत. इतरांना वाचवण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता बाली सामुद्रधुनी परिसरात दुर्दैवी घटना घडली. जावा येथून एका पर्यटनस्थळाच्या दिशेने निघालेली फेरीबोट उलटली.

फेरीबोटीत ५३ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराजवळ म्हणजे सुमारे ५० किमी. अंतर पार केल्यावर फेरीबोट उलटली. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात दुर्दैवी घटना घडली. एकूण नऊ छोट्या बोटींमधून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

आशिया खंडाच्या आग्नेय भागात इंडोनेशिया हा देश आहे. इंडोनेशिया हा १७ हजार लहान - मोठ्या बेटांचा समूह आहे. एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी इंडोनेशियात फेरीबोटींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे इंडोनेशियात अनेक बोटींचे अपघात झाले आहेत. मार्च २०२५ मध्ये बालीच्या किनाऱ्याजवळ उसळलेल्या लाटांमुळे एक बोट उलटली होती. या दुर्दैवी घटनेत एका ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला होता.
Comments
Add Comment

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

डोनाल्ड ट्रम्प यांना २४ तासात उपरती; म्हणाले, मोदी उत्कृष्ट आणि महान पंतप्रधान

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपली

इम्रान खान यांच्या बहिणीवर फेकली अंडी!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी फेकण्यात आल्याची

नेपाळमध्ये फेसबुक आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

काठमांडू : नेपाळमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Afghanistan Earthquake: २२०० जणांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये भूकंप, अन्न आणि औषधांचा प्रचंड तुटवडा

काबूल: जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते, गुरुवारी आग्नेय अफगाणिस्तानला ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप आला.