Thursday, July 3, 2025

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत, ईडीचा फास‌ कायम! उच्च न्यायालयाकडून याचिका रद्दबादल‌

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत, ईडीचा फास‌ कायम! उच्च न्यायालयाकडून याचिका रद्दबादल‌

मुंंबई( प्रतिनिधी): दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कथित घोटाळेबाज आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत असलेल्या ' कनेक्शन ' मार्फत जॅकलिनने मनी लाँड्रिंग (Money Laundering) केले असल्याचा ठपका ईडीने (Enforcement Directorate) ठेवला होता. त्यावर जॅकलिनची याचिका (Petition) नाकारत सुनावणी थांबवण्यास नकार दिला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, जॅकलिनवर सुकेशशी असलेले संबंध नाकारले असले तरी ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटची दखल न्यायालयाने घेतल्याचे न्यायाधीश अनिष दयाल यांनी उच्च न्यायालयाचा सुनावणी दरम्यान म्हटले आहे. त्यामध्ये प्रथमदर्शनी जॅकलिन विरोधात काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.


या याचिकेशिवाय सुकेशने न्यायालयाच्या दोन्ही कनिष्ठ न्यायालयातील याचिकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र याच्याविषयी अजूनही उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. ईडी व इओवी (Economic Offense Wing) दोघांकडून यासंबंधीची चौकशी सुरू आहे.



नक्की काय आहे प्रकरण?


सुकेश चंद्रशेखर यांच्यावर आदिती सिंह यांनी फसवून खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.२०२२ मध्ये दिल्ली पोलिसांनी हा सुकेशवर गुन्हा दाखल केला होता. आदिती सिंह या रेलिगेअर एंटरप्राईजेस कंपनीचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी आहेत. ते जेलमध्ये असताना पैशाच्या मोबदल्यात सिंह यांना सोडवतो असे आश्वासन आदिती सिंह यांना दिले होते. मात्र या संदर्भात त्यांची सुकेशने‌ पैसे घेत फसवणूक केली असा आरोप आदिती सिंह यांनी केला होता. कथित प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा देखील या प्रकरणाशी संबंध असल्याचा ठपका ईडीने चार्जशीटमध्ये ठेवला. ईडीने जॅकलिन फर्नांडिसवर मनी लाँड्रिंगचा‌ गुन्हा दाखल केला होता तसेच वेगळ्या आदिती सिंह प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुकेशवर स्वतंत्र चार्जशीट दाखल केली होती.



जॅकलिनकडून सगळ्या दाव्यांचे खंडन‌ !


जॅकलिनकडून या सगळ्या प्रकरणांत आपला कसलाच संबंध नसल्याचे आपल्या निवेदनात म्हटले होते. तिने म्हटल्याप्रमाणे ' माझा सुकेशशी कुठलाही वैयक्तिक अथवा आर्थिक संबंध नाही. सुकेशसोबत तिचे नाते असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी तिने आपले त्याच्याशी कुठलेही नाते नाही असे प्रसारमाध्यमांना म्हटले होते. उलट सुकेशने माझा वापर करून माझीच फसवणूक केली असा दावा केला. याशिवाय आदिती सिंहने आपली फसवणूक केल्याचा धक्कादायक दावा केला.


याशिवाय सुकेशवर इतर प्रकरणात आर्थिक फसवणूकीचे ढीगभर गुन्हे देशातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे २०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी सुकेशसह दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णयानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा अडचणीही वाढल्या आहेत.

Comments
Add Comment