Thursday, July 3, 2025

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...
काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. आज अखेरीस या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. हा अद्भुत आणि खिळवून ठेवणारा अतिशय रंजक टीझर पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.


या टीझरबद्दल सांगायचं झाल्यास हे विश्व जेव्हा निर्माण झालं तेव्हापासून ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवता तीन जगाचा कारभार पाहतात. ब्रह्मदेव निर्मितीचे , विष्णू सरंक्षक तर शिव संहाराचे कार्य करतात. परंतु जेव्हा त्यांच्या निर्मितीत असंतुलन निर्माण होतं. तेव्हा ५००० वर्षांच्या असंख्य लोकांच्या तपश्चर्येतून श्रीविष्णू श्रीरामाचा अवतार घेतात आणि सुरु होत एक युद्ध. सत्ता आणि बदल घेण्याची प्रवृत्ती असणाऱ्या रावणाचं आणि धर्म आणि त्याग यांची कास धरणाऱ्या श्रीरामाचं.
अनेक युद्धांची समाप्ती करण्यासाठी हे युद्ध सुरु होत. अशा आशयाचा हा टिझर आहे. यानंतर आपल्यासमोर पितळेच्या कोरलेल्या रामायणातील सर्वांच्या मूर्ती समोर येतात. श्रीरामाच्या भूमिकेत असणारा रणबीर कपूर धावत झाडावर चढतो. अधर्माविरुद्ध बाण मारतो जो अनेक अंतर भेदत पुढे जातो आणि आपल्याला रावणाच्या भूमिकेत असणाऱ्या यश म्हणजे रावणाचा चेहरा चेहरा दिसतो. तो चित्रपटाचा सहनिर्मातादेखील आहे. हा टिझर शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो.



'रामायण: द इंट्रोडक्शन' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन तिवारी यांच्याकडे आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर श्रीरामांची भूमिका करणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतामाईंची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येदेखील प्रदर्शित होणार आहे. यामुळे या सिनेमाची व्याप्ती मोठी आहे.या भव्य सिनेमामध्ये उच्च दर्जाचा CGI-VFX वापर, आणि कलात्मक-तांत्रिक सर्जनशीलतेचा वापर केला गेला आहे. Prime Focus Studios, 8 वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, आणि अभिनेता यश यांच्या Monster Mind Creations यांच्यातील सहकार्यामुळे हा प्रकल्प फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता जगभर या महाकाव्याच दर्शन घडणार आहे.
Comments
Add Comment