Thursday, July 3, 2025

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तृतीय पंथीयांना एसटीत प्रवासात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर महिलांसह तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीय पंथीयांना दिलासा मिळणार आहे. कर्नाटकात महिलांसाठी असणारे मोफत बस प्रवास सेवा योजना यामध्ये तृतीयपंथी घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत राज्यातील महिलांना एसटी बस प्रवासात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे.


राज्यातील तृतीयपंथी घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांनाही ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केल्याचे तृतीयपंथी मंडळ उपाध्यक्ष सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >