Wednesday, July 2, 2025

Stock Market : 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: Financial व Bank समभागात घसरण अमेरिकचा दबाव बाजारात कायम? सेन्सेक्स व निफ्टी 'इतक्याने' घसरला वाचा सविस्तर..

Stock Market : 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: Financial व Bank समभागात घसरण अमेरिकचा दबाव बाजारात कायम? सेन्सेक्स व निफ्टी 'इतक्याने' घसरला वाचा सविस्तर..
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रातील सपाट तेजी सपाट घसरणीत बदलेली आहे. अखेरच्या सत्रात बाजारात घसरण झाली आहे. बाजारातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ मुद्यांवर बाजारात अस्थिरतेचे वाता वरण निर्माण झाले. परिणामी बाजारातील पडझड कायम राहत निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्स २८७.६० अंकाने घसरत ८३४०९.६९ पातळीवर दिवसाअखेरीस स्थिरावला असून निफ्टी ५० ८८.४० अंकाने घसरत २५४५३.४० पात ळीवर स्थिरावला आहे. प्रामुख्याने बाजारातील सकाळीच अपेक्षित असलेल्या बँक निर्देशांकात भलीमोठी घसरण झाल्याने बाजारातील सपोर्ट लेवलमध्येही पडझड झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४४३.६१ अंकाने घसरत निर्देशांक (Index) ६३६९०.७७ पातळीवर पोहोचला तर बँक निफ्टीत ४६०.२५ अंकानी घसरण झाल्यामुळे निर्देशांक ५६९९९.२० पातळीवर पोहोचला. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१८%,०.२०% घसरण झाली आहे.

निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१४%,०.४१% घसरण झाली. सकाळ प्रमाणेच मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण राहिली. त्यामुळे सतत तीन दिवस वाढलेल्या मिड व स्मॉलकॅप समभगांना बाजाराने रोखले आहे. दुसरीकडे तुलनात्मकदृष्ट्या ब्लू चिप्स कंपन्यांमध्येही संमिश्र प्रतिसाद कायम राहिला.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये सकाळप्रमाणेच संमिश्र प्रतिसाद दिवसभरात राहिला आहे.सर्वाधिक घसरण अपेक्षेप्रमाणे फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.३६%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.००%), रिअल्टी (१.४४%), पीएसयु बँक (०.८३%), खाजगी बँक (०.६५%), फायनांशियल सर्विसेस (१.०९%), मिडिया (०.३६%) समभागात झाले आहे. सर्वाधिक वाढ कंज्युमर ड्युरेबल्स (१.००%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.३४%), फार्मा (०.३२%), मेटल (१.४१%), फार्मा (०.३२%) समभागात झाले आहे.

मध्यपूर्वेकडील स्थितीत सुधारणा व शांतता आली असली तरी अमेरिका भारत यांच्यातील व्यापार धोरणावर संगनमत न झाल्याने बाजारातील गुंतवणूकदारांवर दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे कंपन्यांचे तिमाही निकाल लागणे सुरू झाल्याने स्वाभाविकपणे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावध पवित्रा घेतला आहे. युएस फेड वक्तव्यानंतर बाजारातील तेचीचे संकेत घसरणीत बदलले.

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मंगळवारी सांगितले की, जर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅनशिवाय अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत चलनविषयक धोरण शिथिल केले असते. तसेच या सुरुवातीला यावर्षीच ट्रम्प यांनी आयात केलेल्या वस्तूंवर जास्त कर लादण्याची वादग्रस्त योजना जाहीर केली नसती तर फेडने या वर्षी पुन्हा दर कमी केले असते का, असे एका पॅनेलमध्ये विचारले असता, पॉवेल म्हणाले, 'मला वाटते की ते बरोबर आहे.' असे उत्तर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवर दिले होते.

'प्रत्यक्षात, जेव्हा आम्ही टॅरिफचा आकार पाहिला आणि टॅरिफच्या परिणामी अमेरिकेसाठी चलनवाढीचा अंदाज लक्षणीयरीत्या वाढला तेव्हा आम्ही थांबलो,व्हाईट हाऊसच्या वाढत्या दबावाला न जुमानता फेडने व्याजदरांवर होल्डिंग पॅटर्न मध्ये प्रवेश केल्यामुळे पॉवेल यांनी ही कबुली मंगळवारी दिली होती. परिणामी डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आहेत. दुसरीकडे फेडरल व्याजदरात लवकर कपात शक्य नसल्यानं अमेरिकन गुंतवणूकदारांना चिंता सतावत होती. मात्र आज पुन्हा बँक ऑफ अमेरिका, गोल्डमन सच, जेपी मॉर्गन चेस, मॉर्गन स्टॅनली यांनी लाभांशात (Dividend) मध्ये वाढ जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक झालेल्या आहेत. त्यामुळे सुरूवातीच्या कलातच अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स (०.२६%), एस अँड पी ५०० (०.१%), नासडाक (०.११%) निर्देशांकात वाढ झाली आहे. युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.२४%), सीएससी (१.०७%), डॅक्स (DAX ०.३६%) वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील वातावरण मात्र संमिश्र राहिले आहे.

गिफ्ट निफ्टी (Gift Nifty ०.४९%), निकेयी २२५ (०.५६%), कोसपी (०.४७%), जकार्ता कंपोझिट (०.४९%), शांघाई कंपोझिट (०.०९%) बाजारात घसरण झाली असून वाढ सेट कंपोझिट (०.५१%), हेगंसेंग (०.६२%), स्ट्रेट टाईम्स (०.५२%) बाजारात झाली आहे.

आज भारतीय बाजारातील आरबीआयच्या सीआरआर कपातीमुळे बँक निर्देशांकातील वाढलेल्या सकारात्मकतेला कात्री लागल्याचे स्पष्ट चित्र दिसले आहे. बँकेसह फायनांशियल समभागात झालेल्या घसरणीमुळे व टेरिफ अडवणूकी पार्श्व भूमीवर बाजारात निश्चित घसरण झाली. मात्र भारतातील फंडामेंटल अजूनही मजबूत असल्याने घसरण मर्यादीत पातळीवर स्थिरावली गेली.

डॉलरच्या मजबूतीमुळे आशियाई चलनांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, ज्यामुळे डॉलर निर्देशांक ०.२% ने घसरून ८५.७० वर बंद झाला. अमेरिकेतील उत्साहवर्धक डेटा आणि गुरुवारच्या बिगर-शेती वेतन अहवालापूर्वी डॉलर निर्देशांक ०.३% ने वाढला होता ज्यामुळे रूपयांची घसरण झाली आहे.आज सोन्याच्या दरातही पुन्हा दुसऱ्यांदा झालेल्या वाढीमुळे बाजारातील रूपयाला देखील फटका बसला आहे. दुपारपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.२०% वाढ झाली होती. तर कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही दुपारपर्यंत आज १.२०% वाढ झाली होती. ओपेक (OPEC) ने कच्च्या तेलाच्या निर्यातदार देशांची बैठक बोलावली असल्याने तेलाचे भाव चढ्या दराने मार्गक्रमण करत आहेत. ऑगस्ट महिन्यात तेलाच्या किंमतीत वाढ अपेक्षित असल्याचे संकेत मिळाल्यानंतर कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही आज वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या Brent Futures निर्देशांकात दुपारपर्यंत १.१९% वाढ झाली असून WTI Futures Index निर्देशांकात १.१०% वाढ झाली होती.

एक्सचेंज डेटानुसार, मंगळवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) निव्वळ आधारावर ₹१,९७०.१४ कोटी किमतीच्या इक्विटीची रोख गुंतवणूक विकल्या आहेत. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ₹७७१.०८ कोटी किमतीच्या इक्विटी खरेदी केल्या. त्यामुळे काल बाजारातील नेट सेलचा परिणामही निर्देशांकात दिसला. आजही तोच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.

आज बीएसईत (BSE) ४१७१ समभागांपैकी १८०९ समभागात वाढ झाली आहे तर २२०५ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे. बीएसईतील केवळ ६ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत. एनएसई (NSE) मध्ये ३०२८ समभागांपैकी १२०५ समभागात वाढ झाली असून १७२३ समभागात घसरण झाली आहे. एनएसई मात्र ९३ शेअर आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत. इंडियन वीआयएक्स (VIX) अस्थिरता निर्देशांक ०.६५% घसरून १२.४५ पातळीवर राहिला होता. त्यामुळे बाजारात अपेक्षित चढउतार आजच्या सत्रात झालेली नाही. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत बीएसईत काही प्रमाणात चढउतार सर्वाधिक राहिली आहे तर एनएसईवरही १ ते ३ या काळात सर्वाधिक प्रमाणात समभागात चढउतार झाले होते.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सॅजिलिटी इंडिया (६.२२%), रिटस (५.७५%), टाटा कम्युनिकेशन (४.७३%), आदित्य बिर्ला फॅशन (४.५४%), कजारिया सिरामिक (४.२८%), गुजरात गॅस (४.०%), एलटी फूडस (३.९५%), बालकृष्ण इंड स्ट्रीज (३.६१%), हिताची एनर्जी (३.४७%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.०४%), ब्लू स्टार (३.०%), टाटा स्टील (३.६४%), जेएसबब्लू स्टील (२.९४%), अंबुजा सिमेंट (२.४०%), एशियन पेंटस (२.११%), अल्ट्राटेक सिमेंट (२.११%), जिंदाल स्टील (१.८३%), मारूती सुझुकी (१.४५%), ट्रेंट (१.२८%), डाबर इंडिया (१.०७%), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (०.५२%) समभागात वाढ झाली आहे.

तर सर्वाधिक घसरण रेडिंगटन (५.३७%), होंडाई मोटर्स (५.२२%), किर्लोस्कर ब्रदर्स (४.७२%), श्रीराम फायनान्स (२.८१%),बजाज फिनसर्व्ह (२.२३%), स्विगी (३.०२%), चोलामंडलम फायनान्स (२.८३%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (२.४९%), इंडसइंड बँक (२.४४%), टोरंट फार्मास्युटिकल (१.९७%), लार्सन ट्युब्रो (१.९१%), बजाज फायनान्स (१.४६%), एलआयसी (१.३३%), एचडीएफसी बँक (१.३०%), पॉवर फायनान्स (१.२४%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (१.२३%) या समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' ट्रम्पने आज ९ जुलैपासून नवीन टेरिफ अमेरिकेच्या आयातीवर लागणार आहे या बातमीनंतर शेअर बाजारात नकारात्मक वातावरण पसरले. नफा वसुलीला सुरवात झाली.बजाज फिनसर्व्ह,एचडीएफसी बॅक एल अँड टी यांची घसरगुंडी पहायला मिळाली. टेक्निकली पहाता २५५०० नंतर बाजारात विक्री होतेच आहे.आता फक्त अमेरिकेत जर व्याजदर कपात झाली तर मोठा ट्रिगर असेल.फेड रिझर्व चे पाॅवेल म्हणतात टेरिफसारख्या गोष्टीं जर आणल्या नसत्या तर आतापर्यंत दरकपात झालीच असती. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात फेड रिझर्व मुद्दामच व्याज दरात कपात करत नाही असे आरोप प्रत्यारोप अमेरिकेत सुरू आहे. ९ तारखेपर्यंत बाजारात मोठी तेजी अपेक्षित नाही.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,' जागतिक पातळीवर मिश्र संकेत, विशेषतः येणाऱ्या टॅरिफ डेडलाइनच्या आधी, गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत. बाजाराचे लक्ष हळूहळू पहिल्या तिमाहीतील महत्त्वाच्या उत्पन्नाकडे वळत आहे, ज्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. मजबूत समष्टि आर्थिक मूलभूत तत्त्वे (Robust Macroeconomic Fundamentals) आणि वाढलेला सरकारी खर्च यासारखे मूलभूत ट्रेंड बाजाराच्या लवचिकतेला पाठिंबा देत आहेत. तथापि, अलीकडच्या तेजीच्या पातळीच्या उल्लंघनाच्या पातळीवर असल्याने, नजीकच्या काळात सावधगिरी बाळगणे अपेक्षित आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'२ जुलै रोजी, भारतीय बेंचमार्क निर्देशांक घसरणीच्या सत्रानंतर लाल रंगात बंद झाले. निफ्टी मजबूत नोटवर उघडला, व्यापाराच्या पहिल्या तासातच २५,६०८ च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. तथापि, उच्च पातळीवर सतत नफा बुकिंग (Profit Booking) केल्याने उलटफेर झाली आणि निर्देशांक २५,४५३.४० वर स्थिरावला, ८८ अंकांनी किंवा ०.३५% ने घसरला. क्षेत्रीयदृष्ट्या, धातू निर्देशांकाने १.४% वाढीसह चांगली कामगिरी केली, तर ग्राहक टिकाऊ वस्तू निर्देशांक १% ने वाढला.दुसरीकडे, विक्रीचा दबाव सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भांडवली वस्तू, रिअल्टी, मीडिया आणि पॉवर क्षेत्रांवर पडला, जो ०.४% आणि १.४% च्या दरम्यान घसरला. विस्तृत बाजारपेठांमध्येही सौम्य कमकुवतपणा दिसून आला, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.१% आणि ०.४% ने घसरले.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने तिसऱ्या सत्रात नफा बुकिंग दर्शविणारा एक मंदीचा मेणबत्तीचा (Decline Candle) देखावा केला कारण तो उच्च पातळीवर टिकून राहू शकला नाही आणि अलिकडच्या काही वाढीचा त्याग केला.बुधवारी सत्रात निर्देशांकाने २५,४०० च्या तात्काळ समर्थन क्षेत्राची (Support Level) चाचणी केली. पुढे जाऊन, बंद आधारावर निर्देशांक २५,४०० च्या वर राहिल्यास येत्या सत्रात २५,९००-२६,००० पातळींकडे परत येईल. तथापि, असे करण्यात अयशस्वी झाल्यास निरोगी रिट्रेसमेंट किंवा एकत्रीकरण होऊ शकते, निर्देशांक २५,२००-२५,७०० च्या विस्तृत श्रेणीत जाण्याची शक्यता आहे. मुख्य स्थितीत्मक समर्थन २५,२००-२५,१०० पातळींवर आहे जे २० दिवसांच्या EMA (Exponenential Moving Average) चा संगम आणि अलिकडच्या एकत्रीकरण ब्रेकआउट क्षेत्राची वरची सीमा (२५,२००-२४,५००) आहे, जे समर्थन पातळी म्हणून काम करण्याची अपेक्षा आहे, ध्रुवीयतेतील बदल दर्शविते, जिथे मागील प्रतिकार समर्थनात (Resistance turn Support) बदलतो.

आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' अलीकडील मजबूत वाढीनंतर बँक निफ्टीने उच्च पातळीवर नफा बुकिंग दर्शविणारा मंदीचा मेणबत्ती निर्माण केला. सार्वजनिक क्षेत्रातील बँक निर्दे शांकानेही त्याचा ६ सत्रांचा विजयी क्रम मोडला आणि जवळजवळ १% ने खाली बंद झाला.निर्देशांक सध्या ५६,८००-५७,००० च्या तात्काळ समर्थन क्षेत्राची चाचणी घेत आहे. पुढे जाऊन, बंद आधारावर निर्देशांक ५६,८०० पातळींपेक्षा जास्त ठेवल्यास येत्या सत्रांमध्ये ५८,००० पातळींकडे परत येईल. तथापि, असे करण्यात अयशस्वी झाल्यास निरोगी रिट्रेसमेंट किंवा एकत्रीकरण होऊ शकते, निर्देशांक ५६,०००- ५७,६०० च्या विस्तृत श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.स्ट्रक्चरल सपोर्ट ५६,०००-५५,५०० क्षेत्राला दिला जातो, जो प्रमुख तांत्रिक निर्देशकांचा संगम दर्शवितो - ज्यामध्ये ५०-दिवसांचा EMA आणि अलीकडील रॅलीचा ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट (५५१४९-५७६१४) यांचा समावेश आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टीट्यूशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,' बुधवारी बेंचमार्क निर्देशांक कमकुवत पातळीवर बंद झाले, कारण अमेरिका-भारत व्यापार करा राच्या आधी मिश्र जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे बाजारातील सहभागींना बळकटी मिळाली. निफ्टी २५,५८८ वर सपाट उघडला आणि काही काळासाठी २५,६०८ च्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला, नंतर नकारात्म क क्षेत्रात घसरला. निर्देशांक अखेर २५,३७८ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला, जो नफा-वसुली आणि नवीन ट्रिगर्सचा अभाव दर्शवितो. तो दिवसाच्या नीचांकी जवळ स्थिरावला, जो मंदीचा पक्षपात दर्शवितो. क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती.

धातू, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कामगिरीने चांगली कामगिरी केली, काही लवचिकता दिली, तर रिअल्टी, वित्तीय सेवा आणि बँकिंग समभागांनी निर्देशांक कमी केला. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, बाजाराची व्याप्ती नकारा त्मक राहिली, ९८ समभागांनी वाढ केली आणि १३० मध्ये घसरण झाली. पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, ब्लू स्टार, टाटा कम्युनिकेशन्स, सीजी पॉवर आणि बालकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट स्पर्ट दिसून आले, जे या काउंटरमध्ये व्यापाऱ्यां च्या रसात वाढ दर्शवते. एकंदरीत, बाजार अजूनही वाट पाहण्याच्या स्थितीत आहे, जागतिक आघाडीवरील महत्त्वाच्या घटना नजीकच्या काळात दिशा दाखवण्याची शक्यता आहे.'

आजच्या रूपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की ,'डॉलर निर्देशांक ९६.५० च्या जवळ मजबूत झाल्याने आणि कच्च्या तेलाला काही आधारभूत आधार मिळाल्याने रुपया ०.१९% ने कमकुवत होऊन ८५.७१ वर व्यवहार करत होता, ज्यामुळे रुपयावर दबाव वाढला. याव्यतिरिक्त, देशांतर्गत भांडवली बाजारातील कमकुवतपणामुळे चलनाच्या मऊपणाला हातभार लागला. बाजाराचे लक्ष या आठवड्यात अमेरिकेतील प्रमुख डेटा रिलीझवर केंद्रित झाले आहे, ज्यामध्ये बिगर-शेती वेतन, बेरोजगारी दर आणि एडीपी रोजगार डेटा यांचा समावेश आहे, जो डॉलरच्या हालचालींना मार्गदर्शन करेल. रुपया ८५.२० ते ८५.८५ च्या श्रेणीत व्यापार कर ण्याची अपेक्षा आहे.'

आजची बाजारातील परिस्थिती पाहता अनेक तज्ञांनी नोंदवलेल्या निरिक्षणानुसार, बाजारात उद्याच्या सत्रात अस्थिरता व मजबूत 'फंडामेंटल' यांचे सहअस्तित्व राहू शकते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा