Wednesday, July 2, 2025

बंगळूरुतील चेंगराचेंगरीला आरसीबीच जबाबदार

बंगळूरुतील चेंगराचेंगरीला आरसीबीच जबाबदार

कॅटच्या अहवालातील निरीक्षणात पोलीस दोषमुक्त


नवी दिल्ली : ४ जून २०२५ रोजी बंगळूरुत झालेल्या चेंगराचेंगरीला आरसीबीचा संघ जबाबदार असल्याचे सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने (कॅट) म्हटले आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय आरसीबीने मिरवणुकीची घोषणा केली. त्यामुळे लाखो लोक रस्त्यावर उतरले, असे म्हणत त्यांनी या घटनेसाठी आरसीबीला जबाबदार धरले आहे. ट्रिब्युनलने या घटनेत पोलिसांची चुकीने नसल्याचेही स्पष्ट केले आहे.


ट्रिब्यूनलच्या अहवालात म्हटले आहे, की ‘आरसीबीने पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नाही. अचानक सोशल मीडियावर पोस्ट केली, त्यामुळे क्रिकेटप्रेमी रस्त्यावर जमले. पोलिसांची बाजू मांडताना ट्रिब्युनलने नमूद केले. लाखो लोक रस्त्यावर उतरत असताना काही तासांत सर्व व्यवस्था करणे त्यांना शक्य नाही. वेळेच्या कमतरतेमुळे पोलिसांना योग्य व्यवस्था करता आली नाही. आरसीबीने पोलिसांना पुरेसा वेळ दिला नाही.

Comments
Add Comment