नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची अचानक झालेली बदली हा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. त्यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात पालक संघ समितीने संस्थेच्या नगर शहरातील कार्यालयासमोर २८ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून, विSद्यार्थ्यांनीही शाळेत उपस्थित न राहता आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. परिणामी, शाळेत शुकशुकाट आहे.