
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खाजगी क्षण बघणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (Prasad Tamdar Baba) असं अटक केलेल्या भोंदूबाबचं नाव आहे. या भोंदूबाबाचे आता सर्व हायटेक कारनामे उघडकीस आले आहेत.
प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक
प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावायचा. या प्रसाद बाबाचे महिला भक्तांसोबत नाचताना त्यांच्यासोबत मठात वार्तालाप करतानाचे अनेक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरील अकाउंटला व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलंय. पुरुष भक्ताचे अंग चोळून त्याला अंघोळ घालणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदारच प्रस्थ गेल्या काही वर्षांत पुणे आणि परिसरात वाढलं होते. इंस्टाग्रामवर याभोंदू बाबाचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंना ...
नेमकं प्रकरण काय?
प्रसादचे वडील भीमराव दातीरने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षांपूर्वी सुरु केला. पुढे CA पर्यंतच शिक्षण झाल्याचा दावा करणारा प्रसादने २०२२ मध्ये स्वतः या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी होता. त्यासाठी प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा. ग्रहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावं लागेल असं कारण तो द्यायचा. मात्र ते ॲप डाउनलोड करताना तो एअर ड्रॉइड कीड हे आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा. पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल एक्टिव्हीटीवर नजर ठेवता यावी यासाठी या एअर ड्रॉइड कीड या ॲपची निर्मिती करण्यात आलीय. या ॲपमुळे भक्ताच्या संपूर्ण मोबाईलचा एक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा. भक्ताच्या मोबाईलमधील कॅमेरातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा. आपण आज कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आज आपण कुठे कुठे गेलो होतो साक्षात्कार झाला असल्याने समजल्याच भक्तांना वाटायचं आणि त्यांचा प्रसाद बाबावरचा विश्वास आणखीनच दृढ व्हायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भक्त झोपी गेला की बाबांचे लैंगिक चाळे सुरु
प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलावून पुढच्या अघोरी विद्येच्या क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा. सलग दोन दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेला की प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक चाळे सुरु करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे, असं सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पडायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.