कैलाश खेर यांच नवं गाणं..गायकाने दिला मराठीतून स्वच्छतेचा नारा...

दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी 'हे मानव' गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.

'हे मानव, हे मानव आदते अब बदल दो कुदरत के बवंडर का इशारा अब समझ लो' असे या गाण्याचे बोल आहेत.या गाण्यातून त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला 'अवकारीका' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी चित्रपटातील 'हे मानव' प्रमोशनल गाणं गायक कैलास खेर यांनी गायलं आहे.अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिलं आहे.

'अवकारीका' चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र या समस्येची जाणीव नसते. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे माझ्यासाठीसुद्धा हा अतिशय वेगळा अनुभव आहे, असं गायक कैलास खेर यांनी सांगितलं.

स्वच्छतेसारखा एक महत्त्वाचा सामजिक प्रश्न 'अवकारीका' चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येईल व लोकांपर्यंत पोहचवता येईल या विश्वासाने चित्रपट दिग्दर्शनाचे शिवधनुष्य हाती घेतल्याचे हाती घेतल्याचे दिग्दर्शक अरविंद भोसले सांगितले आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.
Comments
Add Comment

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप