‘दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागेल’

  58

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प-एलन मस्क यांच्यात पुन्हा जुंपली

मस्क यांनी पुन्हा एकदा दिला नवीन पक्ष स्थापन करण्याचा इशारा

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या नवीन कर व खर्च विधेयकावर जोरदार टीका केली. याला तत्काळ ट्रम्प यांनी उत्तर देत, ‘दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागू शकते,’ असा इशारा दिला आहे. मस्क हे मूळचे दक्षिण आफ्रिका देशाचे आहेत.

ट्रम्प यांच्या नव्या कर व खर्च विधेयकाचे वर्णन मस्क यांनी ‘बिग ब्युटीफूल बिल’ असे केले आहे. हे विधेयक मंजूर झाले तर दुसऱ्याच दिवशी मी अमेरिका पार्टीची स्थापना करेन, असा इशाराच त्यांनी ट्रम्प यांना दिला आहे. मस्क यांनी अलीकडेच ‘एक्स’वर एक पोल (मतदान) घेतले होते. त्यांनी अमेरिकन जनतेला नव्या राजकीय पक्षाबाबत त्यांचे मत विचारले होते. यावर मोठ्या संख्येने लोकांनी मस्क यांना पाठिंबा दर्शविल्याचे दिसले. मस्क यांनी पक्षासाठी ‘अमेरिका पार्टी’ या नावाची घोषणाही केली होती. आपल्या देशाकडे डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन पार्टीशिवाय इतरही पर्याय असले पाहिजेत, जेणेकरून जनता योग्य नेत्याची, पक्षाची निवड करू शकेल, असेही मस्क यांनी म्हटले होते. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्ट करत म्हटले आहे की, टेस्लाचे सीईओंनी खर्च कमी करणाऱ्या विभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी सरकारी अनुदानांवर आणि करारांवर एक नजर टाकावी. मस्क यांना जास्त अनुदान मिळू शकते.

मस्क यांना नेमके काय खटकले?

अमेरिकेतील नवीन कर आणि खर्च विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी साडेसात हजार डॉलरचा लोकप्रिय ग्राहक कर क्रेडिट संपणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन अधिक महाग होतील. याचा थेट फटका मस्क यांच्या कंपनीला बसणार आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) आदेशाला विरोध केला होता. त्यांनी बायडेन सरकारच्या आदेशाला हास्यास्पद म्हटले होते. मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मला पाठिंबा दिला. यावेळी त्यांना माहीत होते की, माझा इलेक्ट्रिक वाहनांना विरोध आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.

Comments
Add Comment

Trump-Putin Alaska Meet: ट्रम्प अलास्काला रवाना, पुतिन यांना लवकरच भेटणार, पण भेटीपूर्वीच दिली धमकी! म्हणाले...

"जर चर्चा अयशस्वी झाली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील" वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार

व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर रशियाची बंदी

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश मॉस्को : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी

अंतराळवीर शुभांशू शुक्ला मायदेशी परतल्यावर घेणार पंतप्रधान मोदींची भेट

वॉशिंग्टन : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) मध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी

इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील