Gold Silver Rate: आज सोन्यात सलग दुसऱ्यांदा भरघोस वाढ चांदी जैसे थे 'हे' कारण सोनेवाढीला कारणीभूत !

प्रतिनिधी: आज सलग दुसऱ्यांदा सोन्यात वाढ झाली आहे. सतत एक आठवड्याच्या घसरणीनंतर बाजारातील सोन्याने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यात मागणी वाढल्यानंतर पुन्हा एकदा सराफा बाजारात गुंतवणू कदारांनी सोन्याच्या पर्याय अंगिकारला. प्रत्यक्ष धातूतील भविष्यदायी गुंतवणूक करावी या निमित्ताने बाजारात सोन्याची सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली होती.विशेषतः २९ ते ३० जुलैला फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत फेडरल रिझर्व्ह बँक भाष्य करू शकते त्यामुळे या धर्तीवर मागणीत वाढ झाली परिणामी सोने वधारले आहे. याशिवाय रूपयांच्या दरातही डॉलरच्या तुलनेत घसरण झाल्यानंतर सोन्याने उसळी घेतली होती.

'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९ रूपये वाढ झाल्याने प्रति ग्रॅम सोने किंमत ९८८९ रुपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४५ रूपयांनी वाढ झाल्याने प्रति ग्रॅम किंमत पातळी ९०६५ रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७४१७ रुपयांवर पोहोचली आहे. माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ४९० रूपयांनी वाढल्याने दरपातळी ९८८८० रूपयांवर पोहोचली आहे. तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ४५० रूपयांनी वाढत पातळी किंमत ९०६५० रूपयांवर गेली. १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ३७० रूपयांनी घसरत ७४१७० रूपयांवर पोहोचली आहे. आज मुंबई, पुण्यासह बहुतांश प्रमुख शहरातील सराफा बाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८८९ रुपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९०६५ रूपये तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७४८० रुपयांवर स्थिरावले आहेत. पर्यायाने बाजार निर्देशांकातही वाढ झाली.

सोन्याच्या एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) कमोडिटी बाजारातील निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाल्याने दरपातळी ९७२९९ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१०% वाढ झाली झाल्याने प्रति ग्रॅम किंमत ३३५१ डॉलवर पोहोचली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.०६% वाढ झाली होती.

आजच्या बाजारातील सोन्याच्या दरपातळीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'अमेरिकेतील प्रमुख डेटा रिलीझची बाजारपेठेत वाट पाहत असताना सोन्याचा भाव मर्यादित श्रेणीत होता. कॉमेक्स गोल्ड ३३२७ - ३३४० डॉलरदरम्यान होता, तर एमसीएक्स गोल्ड ९७,००० - ९७,४०० रूपयांदरम्यान होता ज्याच्या किमती ९६,५०० - ९७,८५० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे कारण संभाव्य डॉलर कमकुवत पणा, नॉन-फार्म पेरोल्स (NFP), ADP नॉन-फार्म रोजगार आणि बेरोजगारी आकडेवारीसह सहभागींची किंमत ९६,५०० - ९७,८५० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. ९६.५० च्या जवळ सौम्य ताकद दर्शविणारा डॉलर निर्दे शांक सोन्याच्या किमतीत तीव्र चढउतार रोखत आहे.'

चांदीचे दर ' जैसे थे '

भारतीय बाजारातील चांदीच्या दरात आज कुठलाही बदल झालेला नसल्याने प्रति ग्रॅम किंमत ११० रूपयांवर कायम आहे. तर प्रति किलो किंमत ११०००० रूपयांवर कायम आहे. जागतिक बाजारपेठेत चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०१% वाढ झाली होती. तर भारतीय बाजारातील एमसीएक्समधील (MCX) चांदीच्या निर्देशांकात (Silver Indices) संध्याकाळपर्यंत ०.३३% वाढ झाल्याने दरपातळी १०७०६३ रूपयावर पोहोचली होती. जागतिक पातळीवर चांदीचा पुरव ठा मागणीपेक्षा मुबलक प्रमाणात असल्याने ही भाववाढ झालेली नाही.
Comments
Add Comment

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

Delhi Gang Rape : धक्कादायक! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक आणि वाहकाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग