Saturday, October 25, 2025
Happy Diwali

'अंतराळात' खाद्य सूक्ष्म शैवालांवर प्रयोग

'अंतराळात' खाद्य सूक्ष्म शैवालांवर प्रयोग

शुभांशू शुक्ला ठरले पहिले भारतीय अंतराळवीर

नवी दिल्ली : ऑक्सिओम मिशन-४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी एका महत्त्वाच्या संशोधन मोहिमेला सुरुवात केली आहे. शुभांशू यांनी आयएसएसमधील आपला तिसरा दिवस सूक्ष्म-शैवालांवरील प्रयोगात व्यतित केला. अशा प्रकारचे प्रयोग करणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.

शुभांशू यांनी पहिल्या प्रयोगात अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्गाचा खाद्य सूक्ष्म शैवालांवर होणारा परिणाम अभ्यासला. हा प्रयोग इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे. सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात खाद्य सूक्ष्म-शैवालांच्या तीन निवडक प्रकारांची वाढ व त्यांच्या चयापचयावर होणाऱ्या परिणामांवर यावर संशोधन केले जात आहे. अंतराळ प्रवासातील परिस्थितीमुळे मानवी स्नायूंच्या विकासात व कार्यप्रणालीत अडथळा कसा येतो, याचा उलगडा करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.

Comments
Add Comment