Friday, October 24, 2025
Happy Diwali

उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी

उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा पहिलीपासून शाळेत सक्तीच्या करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच फाईलवर सही होती. शिउबाठा अर्थात उबाठानेच मराठीचा घात केला आहे. ही माहिती देणारे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत त्रिभाषा सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्याच सरकारने २७ जानेवारी २०२२ रोजी घेतला होता! डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा अनिवार्य करण्याची शिफारस केली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. उद्धव सरकारच्या या निर्णयाची माहिती शिवसेनेने बॅनरद्वारे सर्वांना देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी 'उबाठानेच केला मराठीचा घात' असे बॅनर शिवसेनेने लावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्रिभाषा सक्तीचा निर्णय मागे घेऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांनाच दिलासा दिला आहे.
Comments
Add Comment