
प्रतिनिधी: उद्यापासून क्रियोजेनिक ओजीएस लिमिटेड (Cryogenic OGS Limited IPO), हॅपी स्क्वेअर आउटसोर्सिंग सर्व्हिसेस लिमिटेडचा व्हाईट फोर्स (White Force IPO) या दोन कंपन्यांचा आयपीओ बाजारात उद्यापासून दाखल होत आहे. Cryogenic OGS Limited आयपीओ बीएसई एसएमई (BSE SME) प्रवर्गात येणार असून White Force IPO हा एनएसई एसएमई (NSE SME) या प्रवर्गात येणार आहे.दोन्ही लघूमध्यम पातळीचे आयपीओ (IPO) बाजारात येणार असल्याने किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओला कसा प्रतिसाद देतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दोन्ही आयपीओविषयी -
१) Cryogenic OGS Limited IPO - क्रियोजेनिक ओजीएस लिमिटेड कंपनी आयपीओ हा १७.७७ कोटींचा आयपीओ असणार आहे. ३ ते ७ जुलै कालावधीत हा आयपीओ बाजारात उपलब्ध होणार असून कंपनीने प्राईज बँड (Price Band) ४४ ते ४७ रूपये प्रति समभाग (Share) निश्चित केला होता.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अर्जदारांना कमीत कमी ३००० शेअरचा गठ्ठा (Lot) खरेदी करावा लागणार आहे. ८ जुलैला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येऊ शकते. १० जुलैला हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे. गुंतवणूकदारांना आयपीओसाठी कमीत कमी १३२००० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. Beeline Capital Advisors Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर MUFG Intime India Private Limited (Link Intime) कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Spread X Securities Private Limited कंपनी कामकाज करेल.
एकूण विक्रीसाठी ३७ लाख ८० हजार शेअर्स उपलब्ध होतील त्यातील १८९००० समभाग Spread X Securities या मार्केट मेकरसाठी आरक्षित असणार आहेत. एकूण ३५९१००० शेअर्स हे आयपीओतून इशू (Issue) केले जातील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ५.०% वाटा मार्केट मेकरसाठी,४७.३८% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) १४.२९%, किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांच्यासाठी ३३.३३% वाटा उपलब्ध असणार आहे. कंपनीने यापूर्वीच अँकर गुंतवणूकदार (Anchor Investors) यांच्याकडून ५.०५ कोटींची कमाई केली.
कंपनीचे प्रवर्तक (Promoter) निलेश पटेल, किरणबेन पटेल, धैर्य पटेल हे आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल (Stake) संपूर्ण १००% आहे जो आयपीओनंतर बदलणार आहे.
कंपनीबद्दल -
१९९७ साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. कंपनी प्रामुख्याने गॅस, केमिकल,फ्लूईड इत्यादींसाठी आवश्यक असलेल्या फिल्टरेशन अवजारे (Equipment) बनवते. ग्राहकांच्या गरजेनुसार (Specific Requirements) कंपनी इतर सेवा देखील पुरवते. कंपनी डिझाइन, प्रक्रिया अभियांत्रिकी आणि उत्पादन उपाय प्रदान करते, ज्यामध्ये फॅब्रिकेशन, असेंब्ली आणि चाचणी सुविधांचा समावेश आहे.
कंपनीची आर्थिक परिस्थिती -
कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मार्च २०२४ मधील २५.६७ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ पर्यंत ३२% महसूल (Revenue) वाढून ३३.७० कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील ६.३९ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये ७.९६ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये मार्च २०२४ मधील ५.३५ कोटींच्या तुलनेत १५% वाढ होत मार्च २०२५ मध्ये नफा ६.१२ कोटींवर पोहोचला होता. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६७.१२ कोटी रुपये आहे.
कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवल गरजेसाठी (Working Capital Requirement), दैनंदिन कामकाजासाठी, पब्लिक इशू (Public Issue) खर्चासाठी करणार आहे.
२) White Force IPO- व्हाईट फोर्स आयपीओ (White Force IPO) हा २४.२५ कोटींचा आयपीओ उद्यापासून दाखल होणार आहे. या आयपीओत ३१.९० लाखांचे समभाग (Share) फ्रेश इश्यूसाठी उपलब्ध असणार आहेत. ३ ते ७ जुलैपर्यंत हा आयपीओ बाजारात असेल. ८ जुलैला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) होऊ शकते. कंपनीचा आयपीओ एनएसई एसएमईवर १० जुलैला सूचीबद्ध (Listed) होऊ शकतो. कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीने ७२ ते ७६ रूपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित (Price Band) निश्चित केला होता. Corpwis Advisors Private Limited कंपनी ही आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Purva Sharegistry India Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून काम Giriraj Stock Broking Pvt Ltd कंपनी पाहेल.
एकूण ३१ लाख ९० हजार शेअर्समध्ये २८०००० शेअर्स मार्केट मेकरसाठी आरक्षित असणार आहेत. उर्वरित २९०२४०० शेअर बाजारात फ्रेश इश्यू असणार आहेत. आयपीओतील गुंतवणूकीसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी ११५२०० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. अर्ज करण्यासाठी किमान १६०० शेअरचा गठ्ठा खरेदी करावा लागेल असे कंपनीने म्हटले आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ९.०३% वाटा आरक्षित, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४५.३९%, किरकोळ गुंतव णूकदारांसाठी ३१.९०% वाटा गुंतवणूकीसाठी आरक्षित असणार आहे.
कंपनीबद्दल -
श्रद्धा राजपाल, नलिनी राजपाल या कंपनीच्या प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८४% होते जे आता आयपीओनंतर ६०.८९% खाली येऊ शकते. कंपनी एप्रिल २०१७ साली स्थापन करण्यात आली होती. प्रा मुख्याने कंपनीचा प्रमुख व्यवसाय हा एचआर आऊटसोर्सिंग, नोकरभरती, पेरोल, स्टाफिंग या सेवेशी संबंधित आहे. कंपनी मनुष्यबळ संसाधनाचे ऑनलाईन व्यासपीठ ठरवते.
कंपनीच्या आर्थिक परिस्थिती -
आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील कंपनीचा महसूल (Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६९.५४ कोटीवर पोहोचला होता जो ४०% वाढत मार्च २०२५ पर्यंत ३९.६४ कोटी प्राप्त झाला होता.मार्च २०२४ मध्ये कंपनीला करपूर्व नफा (EBITDA) ६.६४ कोटींचा मिळाला होता जो मार्च २०२५ पर्यंत वाढत ९.४५ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT ). यामध्ये मार्च २०२४ मधील ४.३९ कोटीत ३४% वाढ झाल्याने परिणामी कंपनीचा करोत्तर नफा डिसेंबर २०२५ पर्यंत ५.९० कोटींवर पोहोचला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ८८.१६ कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.