टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

  27

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई


पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी अंतर्गत येणाऱ्या सुखडआंबा गावातील जलजीवन पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून १७ मार्च २०२५ रोजी दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आमदार विनोद निकोले यांनी १ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. निकोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर केले.


सुखडआंबा येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. १७ मार्च रोजी तीन शाळकरी मुली येथील पाण्याच्या टाकीवर चढल्या व खाली उतरत असताना टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थिनी या घटनेत जखमी झाली होती. या प्रकरणात मे. हरेश बोअरवेल या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कंत्राटी अभियंत्यास सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. संबंधित पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत वीर जिजामाता इन्स्टिट्यूट मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे.


दरम्यान, या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलींच्या कुटुंबीयांना अधिकची भरपाई द्यावी यासाठी आमदार विनोद निकोले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. आमदार निकोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाणी पुरवठा विभगातील उपअभियंता बी. के. शिंदे आणि कार्यकारी अभियंता आर.आर. पाध्ये यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर केले. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याची सूचना देण्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले असून, मृत मुलींच्या कुटुंबीयांना अधिकची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७