Tuesday, July 1, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी


मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, निवतकर आणि वारभुवन यांना आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली .


आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. याप्रसंगी आयोगाचे सदस्य अभय वाघ आणि सतिश देशपांडे यांच्यासह आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, सहसचिव तथा परीक्षा नियंत्रक सरिता बांधेकर- देशमुख, उपसचिव मा. पां. जाधव उपस्थित होते.

नव नियुक्त सदस्यांची माहिती


राजीव निवतकर IAS 2010


हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असून यांनी विविध महत्वाच्या पदांवर कामगिरी केली आहे. खाली त्यांच्या प्रमुख पदांची माहिती दिली आहे:


संचालक :आपत्ती व्यवस्थापन.

सहसचिव: मुख्य सचिव कार्यालय.

मुंबई जिल्हाधिकारी (कलेक्टर, मुंबई सिटी):

आयुक्त: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन

संचालक: विमान चालन

महेंद्र ब. वारभुवन (M. B. Warbhuvan) IAS 2010


हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांनी प्रशासनात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे 


सचिव: महाराष्ट्र राज्य कृषी परिषद पुणे.

मुख्य कार्यकारी अधिकारी: जिल्हा परिषद पालघर

सहसचिव: सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय.

अतिरिक्त आदिवासी आयुक्त :ठाणे विभाग.

आयुक्त: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell)  तथा सचिव प्रवेश नियामक प्राधिकरण, मुंबई
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >