
जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह काढण्यात आल्याचे आणि रुग्णालयात तीन जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सिगाची केमिकल्समधील दुर्घटनेची चौकशी होणार आहे.
कारखान्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना स्फोट झाला. रिअॅक्टर फुटला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. ही आग वेगाने पसरली. अनेकांना स्वतःला सावरण्याची, वाचवण्याची संधी मिळाली नाही.
स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात १५० जण होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या भागात ९० जण कार्यरत होते. स्फोटाचा आवाज येताच अनेकांनी वेगाने कारखान्याबाहेर धाव घेतली. पण झपाट्याने पसरलेल्या आगीमुळे ३४ जणांना जीव गमवावा लागला.