
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात आश्वासक वाढ झाली आहे. सकाळी सत्र चालू होताच सेन्सेक्स २०३.५१ अंकाने व निफ्टी ६२.२५ अंकाने उघडला आहे. ही वाढ प्रामुख्याने कालच्या मजबूत 'फंडामेंटल' मुळे तसेच क्षेत्रीय निर्देशांकाबरोबर मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर झाल्याची शक्यता आहे. काल तेजी असूनही निर्देशांकातील घसरणीनंतर आजचाही दिवस तेजीचा असल्याची दाट शक्यता आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सेन्सेक्स बँक निर्देशांक (Sensex Bank Index) मध्ये ६१.७६ अंकाची घसरण झाली आहे. निफ्टी बँक निर्देशांक (Nifty Bank Index) मध्ये ३१.४५ अंकाची घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१५, ०.१६% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९%, ०.०८% वाढ झाली.
सकाळच्या सत्रात सुरूवातीला निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये गुंतवणूकदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. प्रामुख्याने जागतिक अनुषंगाने क्षेत्रीय विशेष (Sector Specific Indices) समभागात वाढ व घसरण कायम राहिल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.४७%), फार्मा (०.२१%), मिडिया (०.३९%), फार्मा (०.२१%) समभागात (Stocks) मध्ये झाला आहे. सर्वाधिक वाढ आयटी (०.५०%), रिअल्टी (०.३६%), हेल्थकेअर (०.२४%), तेल व गॅस (०.४६%), मिडस्मॉल आयटी व टेलिकॉम (०.३९%) समभागात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच वीआयएक्स (VIX Volatility Index VIX) निर्देशांकातील पातळी १% हून अधिक वाढल्याने बाजारातील अस्थिरतेचेही संकेत मिळत आहेत. सकाळी युएस व भारत यांच्यातील एफटीए (FTA) व्यापारी बोलणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे बाजारात आत्मविश्वास कायम असला तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न झाल्यानंतर अमेरिकन बाजारातील बेरोजगारी आकडेवारी आलेली नसल्याने बाजारातील परिस्थितीत शंका कायम आहे. सकाळी गिफ्ट निफ्टी सपाट राहिल्याने निफ्टी पातळी २५५१५ अंकावर होती. मात्र ९.४० वाजता गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) पातळी ०.१५% वाढली होती.
आयपीओ (IPO) मध्ये एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस,कल्पतरू आयपीओ, ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट आयपीओ,श्री हरे कृष्णा स्पंज आयर्न आयपीओ,आणि एजेसी ज्वेल आयपीओ आज स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल होणार आहेत. तत्पूर्वी अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्सचा (०.०५%) वगळता एस अँड पी ५०० (०.५२%), नासडाक (०.४७%) समभागात वाढ झाली होती. आशिया बाजारात निकेयी २२५ (०.९६%) अपवाद वगळता बहुतांश बाजारात वाढ कायम होती ज्यामध्ये सर्वाधिक वाढ कोसपी (Kospi १.२७%), शांघाय कंपोझिट (०.२१%), तैवान वेटेड (१.३६%) बाजारात झाली होती.
जपानच्या तुलनेत एमएससीआय आशिया निर्देशांकात ०.६% वाढ आणि अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटींमध्ये प्रगतीच्या आशेवर वॉल स्ट्रीटवर सकारात्मक बंद झाल्यामुळे ' बुलिश' वाढ झाली होती दरम्यान, ओपेक+ (OPEC) उत्पादन वाढीच्या अपेक्षेमुळे तेलाच्या किमती घसरल्या, हा भारतासाठी अनुकूल ठरल्या आहेत जो एक प्रमुख कच्चा तेल आयातदारही आहे. प्रमुख आर्थिक डेटा आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्या राजकोषीय सुधारणांवरील मतदानापूर्वी अमेरिकन डॉलर घसरला होता. सत्राच्या सुरुवातीला रूपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये १५ पैशानी घसरण होत रूपयाची किंमत प्रति डॉलर ८५.६१ रूपयांवर गेली आहे.
जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरातही आजही घसरण कायम असून सकाळच्या सत्रात क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे. सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक ०.८३% वाढला असून क्रूड WTI Futures निर्देशांकात ०.४९% घसरण झाली आहे तर Brent Future Index निर्देशांकात ०.४९% घसरण झाली आहे. बाजारातील आज एकूणच परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना आश्वासक चित्र पहायला मिळत आहे.
आज सकाळी सुरुवातीच्या कलात रेमंड (७.४%), एचबीएल इंजिनियरिंग (६.०५%), एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी (५.४%), जेम्सडब्लू होल्डिंग्स (४.९७%), अपोलो हॉस्पिटल (३.५१%), भारत इलेक्ट्रॉनिक (४.१३%), भारत डायनॅमिक्स (३.०७%), माझगाव डॉक (२.७७%), अदानी पॉवर (२.११%), अव्हेन्यू सुपरमार्ट (१.८९%), एशियन पेंटस (१.५३%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (१.४२%), होंडाई मोटर्स (१.३२%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.२८%), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (०.६५%) सम भागात वाढ झाली आहे.
सर्वाधिक घसरण कोरोमंडल इंटरनॅशनल (४.५३%), होम फर्स्ट फायनान्स (३.१९%), डिक्सन टेक्नॉलॉजी (२.९९%), एल अँड टी फूड (२.२२%), टोरंट फार्मा (१.७१%), बँक ऑफ बडोदा (१.४४%), चोलामंडलम फायनान्स (१.९३%), एक्सिस बँक (१.६७%), कॅनरा बँक (१.०१%), जेल इंडिया (०.८६%), सन फार्मा (०.८२%), युनायटेड स्पिरीट (०.६९%), पंजाब नॅशनल बँक (०.६७%), ब्रिटानिया (०.६७%), टाटा स्टील (०.५३%) या समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वीके विजयाकुमार म्हणाले,'अमेरिकेतील मातृ बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक प्रस्थापित केल्याने, जागतिक शेअर बाजा राचा मूड सकारात्मक आहे. पश्चिम आशियाई भूराजनीती आता जागतिक अर्थव्यवस्थेसाठी किंवा बाजारपेठांसाठी धोका नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे मजबूत मॅक्रो भारतीय शेअर बाजारात निधीचा प्रवाह वाढवू शकतात. डॉलरमध्ये सतत कमकुवतपणा (डॉलर निर्देशांक आता ९६.८१ वर आहे) म्हणजे एफआयआयकडून (FII) मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता कमी आहे.
उच्च मूल्यांकन असूनही ते खरेदी करत राहू शकतात. पुढे जाऊन, टॅरिफ फ्रंटवरील घडामोडींमुळे बाजार प्रभावित होण्याची शक्यता आहे. भारत-अमेरिका व्यापार करार सकारात्मक असेल आणि जर तो झाला नाही तर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजारातील मुख्य चिंता ही कमी उत्पन्न वाढ आहे. उत्पन्न वाढीमध्ये अद्याप मजबूत पुनर्प्राप्तीचे कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. ऑटो स्टॉक आजच्या ऑटो विक्रीच्या आकडेवारीला प्रतिसाद देतील.'