रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

  140

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार


मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.


कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ​केवळ विचारधारेशी एकनिष्ठता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत. सोबतीला उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्व​. या बळावर २५ वर्षांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशी राजकीय वाटचाल रवींद्र चव्हाण यांची​ राहिलीय. त्यांच्या रुपानं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासाठी नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.



कल्याण-डोंबिवली महापालिकेत​ ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले​ होते. त्यानंतर 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्या विधानसभेत पोहोचले.​युवा कार्यकर्ता ते मंत्री असा टप्पा त्यांनी पूर्ण केलाय. पक्षाचे​ सरचिटणीस, कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. कोकणच्या भाजप विस्तारामध्ये चव्हाण यांचा मोठा वाटा राहिलाय. आता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळं कोकणातील भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे.



​समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद ठरले ते रविंद्र चव्हाण. समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची, अशी त्यांची आजपर्यंतची कार्यशैली राहिलेली आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रविंद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले​. ​म्हणूनच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामाकंन भरताना राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत: हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो, अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.



गेल्या २५ वर्षांतील रविंद्र चव्हाण यांच्या प्रवासाचा हा मागोवा​ घेऊया...



  • २००२ साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

  • २००५ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी.

  • २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान.

  • २००९ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय.

  • २००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार.

  • यादरम्यान २०१६ साली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी;
    तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी.

  • २०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी.

  • २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार.

  • ​२०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक.

  • २०२२ साली​ स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या २ खात्यांचा कारभार, तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या २ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी.

  • प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्व प्रदेश प्रभारी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांवर रविंद्र चव्हाण कार्यरत होते.

Comments
Add Comment

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर) प्रवेश घेऊ

Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील