Tuesday, July 1, 2025

New Rules: आज १ जुलैपासून अनेक आर्थिक नियमनात बदल ज्याचा तुमच्या खिश्यावर होणार परिणाम काय बदल झाले जाणून घ्या एका क्लिकवर...

New Rules: आज १ जुलैपासून अनेक आर्थिक नियमनात बदल ज्याचा तुमच्या खिश्यावर होणार परिणाम काय बदल झाले जाणून घ्या एका क्लिकवर...

प्रतिनिधी: सरकारने आजपासून आर्थिक धोरणात महत्वाचे बदल केले असल्याने काही नियमात आजपासून बदल होत आहे. १ जुलैपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. नव्या माहितीनुसार, तुमच्या आर्थिक व्यवहारांवर या निर्णयाचा मूलभूत परिणाम होणार आहे. नव्या नियमानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) नियामक मंडळाने म्हटल्याप्रमाणे, नव्या पॅन कार्डासाठी अर्ज केल्यास प्रथम ग्राहकांना आधार कार्डाचीही पडताळणी करणे अनिवार्य होणार आहे. पारदर्शक कारभारासाठी तसेच दोन्ही कार्डाची सोयीस्कर जोडणीसाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारच्या सीबीडीटी नियामक (Regulatory) मंडळाने म्हटले आहे. १ जुलैपासून म्हणजेच आजपासून हा निर्णय लागू होणार आहे.


या नियमनात पूर्वी पॅन कार्ड अर्जासाठी पुरेशी असणारी जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate), आयटी (ओळखपत्र) केवळ चालणार नाहीत. यासाठी नागरिकांना नव्या नियमानुसार आधार कार्डची पडताळणी करावी लागणार आहे.


आयटीआर फायलिंगमध्ये ही फेरबदल -


आयटीआर (Income Tax Return ITR) भरण्यासाठी जुलै महिन्याच्या अंतिम मुदतीत सीबीडीटीने वाढ केली आहे आता नव्या नियमानुसार तारखेत फेरबदल करून ३१ जुलैच्या ऐवजी १५ सप्टेंबर ही अंतिम तारीख करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना व्यवस्थितपणे विना घाईगडबडीशिवाय (Hasle Free) आयकर भरणे सोयीस्कर होणे आहे.


काही क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून नियमावलीत बदल -


क्रेडिट कार्ड शुल्कात (Credit Card Charges) यामध्ये मुख्य प्रवाहातील खाजगी बँका एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, तसेच एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमनात बदल झाला आहे.


एसबीआय क्रेडिट कार्डातील हवाई अपघात विमा (Air Accident Insurance) ही अतिरिक्त निवडक प्रिमियम कार्डावर उपलब्ध असलेली सुविधा बंद होणार आहे. त्याशिवाय एसबीआयसह इतर पीएसयु बँकादेखील आपल्या क्रेडिट का र्डा (Credit Card) संदर्भात नवीन किमान देय रक्कम किंवा MAD (Monthly Amount Due मासिक बिलांसाठी) गणना देखील सुरू करणार असल्याचे म्हटले जात आहे. १५ जुलैपासून एसबीआय कार्ड आपल्या MAD दरात फेरबदल करण्याची शक्यता असून आकडेमोड करताना जीएसटी कर, ईएमआय हप्ता, इतर फी, फायनान्स शुल्क, थकबाकीवर २% व्याजदर अशा विविध सेवा अंतर्भूत असणार आहेत. जीएसटी, ईएमआय, शुल्क,वित्त शुल्क, शिल्लक हस्तांतरण, किरकोळ व्यवहार आणि रोख आगाऊ रक्कम यांना प्राधान्य देऊन, देयके एका निश्चित क्रमाने आकारली केली जाणार आहे.


एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड शुल्कात बदल -


एचडीएफसी बँक (HDFC Bank) मध्ये दिल्या जात असलेल्या क्रेडिट कार्डमध्ये ऑनलाईन गेमिंग व वॉलेट व्यवहारांसाठी (Wallet Load Transactions) वर १% फी आकारणी केली जाणार आहे. मात्र ही शुल्क आकारणी १०००० रूपयांच्या वर वॉलेट लोड व्यवहारावर असणार आहे. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त कंज्युमर कार्ड (Consumer Card) किंवा ७५,००० रुपयांपेक्षा जास्त बिझनेस कार्ड युटिलिटी बिल पेमेंटसाठी १% शुल्क आकारले जाणार आहे ज्याची मर्यादा ४,९९९ रुपये असेल तसेच भाडे, इंधन (कार्ड प्रकारानुसार १५,००० रुपयांपेक्षा जास्त किंवा ३०,००० रुपये) आणि थर्ड-पार्टी प्लॅटफॉर्मद्वारे शैक्षणिक पेमेंटसाठी १% शुल्क आकारले जाईल ज्याची मर्यादा ४,९९९ रुपये असेल.


ऍक्सिस बँकेच्या नियमात बदल -


ऍक्सिस बँकेनेही (Axis Bank) आपल्या नियमात बदल केला. आता बँकेच्या २१ व्यवहार (Transaction) ऐवजी २३ एटीएम व्यवहार (ATM Transactions) करता येणार आहेत. २३ वेळेपर्यंत केलेल्या एटीएम व्यवहारांवर कुठलीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. त्यावर एटीएम व्यवहार केल्यास मात्र शुल्क आकारणी केली जाईल.


आयसीआयसीआय बँकेच्या नियमातही बदल -


आयसीआयसीआय बँकेच्या बदलांमध्ये एटीएम व्यवहारांसह सेवा शुल्कात बदल होणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधील पहिले पाच शुल्क मोफत राहणार आहेत. त्यानंतर रोख रक्कम काढण्यासाठी प्रत्येक केलेल्या एटी एम व्यवहारासाठी (ATM Transcations) २३ रुपये शुल्क आकारले जाईल. आर्थिक नसलेले व्यवहार (Non Financial Transcations) मोफत राहतील असे बँकेने म्हटले आहे.


जर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक बँक नसलेले एटीएम वापरत असतील तर महानगरांसाठी तीन आणि लहान शहरांमध्ये पाच मोफत व्यवहार मर्यादित आहेत. याशिवाय तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी अनुक्रमे २३ रुपये आणि ८.५ रुपये द्यावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय एटीएमवरील व्यवहारांसाठी, बँक प्रति रोख रक्कम काढण्यासाठी १२५ रुपये, आर्थिक नसलेले इतर व्यवहारांसाठी २५ रुपये आणि ३.५ टक्के चलन रूपांतरण शुल्क (Currency Conversion Fee) बँकेकडून आकारण्यात येणार आहे.


जीएसटीआर (GSTR 3B Return) बदल -


जीएसटीआर हे नॉन-एडिटेबल होणार आहेत. एकदा जुलैला जीएसटीआर फाईल केल्यास त्यामध्ये बदल होणार नाहीत. एकदा भरल्यावर तो ऑटोमॅटिक (Auto Populated) होणार आहेत. त्यासाठी पुन्हा फेरफार करता येणार नाहीत. त्या मध्ये कुठलाही बदल पुन्हा करता येणार नाही.


रिझर्व्ह बँकेने कॉल मनी मार्केटचे तास वाढवले -


भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जुलैपासून म्हणजेच आजपासून इंटरबँक कॉल मनी मार्केट ट्रेडिंग (Interbank Call Money Market Trading Window) विंडो सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत वाढवली आहे. यामुळे बँकांना दररोज अतिरिक्त दोन तास निधी उधार घेता येईल आणि कर्ज देता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >